शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

येवला शहरात दत्त जन्मोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 01:19 IST

येवला : शहरात ठिकठिकाणी दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहर व कॉलनी भागातील सातही दत्त मंदिरांत सायंकाळी उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळलेली होती.

ठळक मुद्देभाविकांची गर्दी : ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रम

येवला येथील गुरु देव विश्वस्त संस्थेत गुरु दत्त जयंतीनिमित्त पूजन करताना तहसीलदार रोहिदास वारु ळे. समवेत उपस्थित भाविक.

 

 

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : शहरात ठिकठिकाणी दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहर व कॉलनी भागातील सातही दत्त मंदिरांत सायंकाळी उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळलेली होती.येवल्यातील पारेगाव रोडवरील श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती उत्सवासह नाम-जप-यज्ञ साप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी गुरुचरित्र पारायणाचे वाचन १२१ सेवेकऱ्यांनी केले. सातही दिवस विविध यागांचे आयोजन करण्यात आले होते. गणेश याग, मनोबोध याग, चंडी याग, गीताई याग, स्वामी याग, रूद्र याग यासह १० यागांचे आयोजन विधिपूर्वक करण्यात आले.प्रहर सेवेत अखंड वीणावादन, अखंड स्वामीजप, स्वामीचरित्र वाचन करण्यात आले. बुधवारी दत्तजयंतीनिमित्त गुरुचरित्राचा तिसरा अध्यायाचे वाचन करून महाआरती व जन्मोत्सव साजरा करण्यात आला. गुरुवारी (दि. १२) सत्यदत्त पूजन व महाआरतीने सप्ताहाची सांगता होणार आहे. स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ लक्षवेधी रांगोळी काढण्यात आली होती. या यज्ञ सप्ताहात श्रीगुरुचरित्र व श्रीमत्भागवत पारायणासाठी मोठ्या संख्येने सेवेकऱ्यांनी सहभाग घेतला. दत्तात्रेय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सेवेकºयांनी कार्याक्रमाचे यशस्वी आयोजन केले.दत्त जयंतीनिमित्त हुडको वसाहतीत अष्टविनायक ग्रुपतर्फे वसाहतीतील दत्त मंदिरात पूजा-अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाआरती होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गुरु देव दत्त विश्वस्त संस्थेत दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी संजय कुलकर्णी यांच्या हस्ते दत्तमूर्तीवर अभिषेक करण्यात आला. गोविंदनगर येथील मंदिरात दत्तपूजन करण्यात आले. दत्तवाडी येथे उमाकांत महाराज यांच्या हस्ते दत्तपूजा करण्यात आली.भाविकांना महाप्रसादाचे वाटपबस आगारात व शहर पोलीस ठाण्यात दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शहर पोलीस ठाण्यात शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, उपनिरीक्षक मोरे, चंद्रकांत निर्मळ यांनी श्री दत्ताला अभिषेक करून पूजन केले. सावरगाव येथील स्वामी समर्थ केंद्रात दत्त जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार रोहिदास वारु ळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :yevla-acयेवलाTempleमंदिर