शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

दुतोंड्या मारूती बुडाला; गोदावरीने ओलांडली धोक्याची पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 3:47 PM

दुपारी दोन वाजेपर्यंत १७ हजार ७४८ क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे रामसेतूवरून पूराचे पाणी गेले असून दुतोंड्या मारूतीची मुर्ती पाण्यात बुडाली आहे. गोदावरीच्या काठालगत अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्दे१७ हजार क्युसेकपेक्षा अधिक पाणी गोदापात्रात प्रवाहितगंगापूर धरणाचा जलसाठा ८५ टक्क्यावर पोहचला

नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी मध्यरात्रीपासून अद्यापपर्यंत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाणलोटक्षेत्रातून पाण्याची जोरदार आवक धरणात होऊ लागल्याने सकाळी नऊ वाजेपासून विसर्ग करण्यात येत आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत १७ हजार ७४८ क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे रामसेतूवरून पूराचे पाणी गेले असून दुतोंड्या मारूतीची मुर्ती पाण्यात बुडाली आहे. गोदावरीच्या काठालगत अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूराचे पाणी येथील कपालेश्वर मंदिराच्या पहिल्या पायरीपर्यंत आले आहे. त्यामुळे सरदार चौकापासून पुढे गोदाकाठालगतचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. गोदाकाठावरील जवळपास सर्वच मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.गंगापूर धरणातून सातत्याने विसर्गात वाढ करण्यात येत असून सध्या १७ हजार क्युसेकपेक्षा अधिक पाणी गोदापात्रात प्रवाहित झाले आहे. नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मध्यरात्रीपासून पुढील दोन दिवस पश्चिम, मध्य महाराष्टÑासह कोकण व नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. घाटक्षेत्राच्या परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढला आहे. त्यामुळे गंगापूर धरणात त्र्यंबक, अंबोली या पाणलोटक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. परिणामी गंगापूर धरणाचा जलसाठा ८५ टक्क्यावर पोहचला. सकाळी नऊ वाजेपासून विसर्गात वाढ करण्यात आली आहे. अकरा वाजेपासून गोदावरीच्या जलस्तर उंचविण्यास सुरूवात झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत दुतोंड्याच्या डोक्याला पूराचे पाणी लागले. यामुळे बालाजी कोठपर्यंत पुराचे पाणी आले होते. गोदावरी नदीवरील घारपूरे घाट पूल, अहल्यादेवी होळकर पूल, संत गाडगे महाराज पूलावर नागरिकांनी पूर बघण्यासाठी गर्दी केली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.शहरातदेखील मध्यरात्रीपासून संततधार सुरू असल्यामुळे अहल्यादेवी होळकर पूलाखालून पुढे रामकुंडात १३ हजार ३३० क्युसेक इतके पाणी प्रवाहित आहे. मागील २४ तासांत शहरात ३३ मि.मी इतका पाऊस नोंदविला गेला. गोदावरीने धोक्याची पातळी गाठली असून नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सायखेडा, चांदोरी या भागातदेखील गोदावरीची पातळी वाढली असून सायखेड्याच्या धोकादायक पुलाला पूराचे पाणी लागले आहे. तसेच गोदाकाठावरील दुतोंड्या मारूतीची मुर्ती मानेपर्यंत बुडाली आहे. नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू पुलाला पाणी लागले असून विसर्गात वाढ झाल्यास या पुलावरूनही पूराचे पाणी वाहण्याची दाट शक्यता आहे. पूर बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या पूलांवर गर्दी करू नये असे आवाहन जिल्हा आपत्ती व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दुतोंड्या मारुती कमरेपर्यंत बुडाला, तर गंगा-गोदावरी मंदिरासह वस्त्रांतरगृहातही पाणी शिरले. गोदाघाटावरील लहान पूल, मंदिरे पाण्याखाली गेली. देवमामलेदार मंदिर, नीळकंठेश्वर मंदिरासह नारोशंकर मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. सांडव्यावरील देवी मंदिर पाण्याखाली गेले आहे. यामुळे नदीकाठालगत असलेल्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली असून सांडव्यावरील देवी मंदिर, कपालेश्वर मंदिर, सरदार चौक, पिंपळ चौक, बालाजी कोठ, सराफ बाजार या भागातील विक्रेत्यांनी दुकानांमधील विक्रीचे विविध साहित्य सुरक्षित स्थलांतरीत करण्यास सुरूवात केल्याचे चित्र पहावयास मिळाले. तसेच नागरिकांनी गोदाकाठालगत असलेली वाहने काढून घेतले आहे. गंगापूर धरणातून होणाऱ्या विसर्गाची पूर्वसूचना मिळाल्याने गोदाकाठावरील रहिवाशांसह विक्रेतेही सतर्क झाले आहेत. गोदाकाठाच्या परिसरात जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे दहा जवानांचे रेस्क्यू पथक गस्तीवर आहेत. पूराच्या पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांकडून दंडूका दाखविला जात आहे. रेस्क्यू पथकाकडून वारंवार नदीकाठालगत सावधानतेच्या विविध सुचना ध्वनिक्षेपकांंद्वारे दिल्या जात आहेत. तसेच अग्निशमन दलाचेपथकही गस्तीवर आहे.संततधार पाऊस आणि पूर बघण्यासाठी बाहेर पडलेले नाशिककर यामुळे शहरातील रविवार कारंजा, अशोक स्तंभ, मालेगावस्टॅन्ड, पंचवटी, सराफ बाजार, दहीपूल, शालीमार या भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहतूक पोलीस जणू शहरातून अचानक गायब झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पूलांवर बिकट परिस्थिती पहावयास मिळत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरीfloodपूरgangapur damगंगापूर धरणHigh Alertहाय अलर्ट