शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
2
हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...
3
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
4
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
5
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
6
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका
7
राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम वेगाने सुरु; ‘असा’ असेल राम दरबार, कधी होणार पूर्ण?
8
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
9
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
10
‘पैसे मिळाले नाहीत का तुला? मिळाले नसतील तर...’, भरसभेत अजित पवार यांनी विचारलं आणि...
11
“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस
12
Lok Sabha Elections 2024 : भावासाठी भाऊ मैदानात! युसूफ पठाणच्या विजयासाठी इरफानने कसली कंबर!
13
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 350 अंकांनी घसरले, 7 लाख कोटी बुडाले
14
भाजपा नेते सूरज पाल अम्मू यांचा राजीनामा, पत्राद्वारे सांगितलं कारण....
15
दिवसभर केलं शूट, इंटिमेट सीननंतर झाल्या वेदना; 'हीरामंडी' फेम अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख
16
'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर
17
"डबल इंजिन सरकारने शेतकरी, मजुरांना डबल झटका दिला; भाजपा संविधानाशी खेळतेय"
18
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
19
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
20
"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य

धूळ खात पडून असलेल्या मशीनरी सुरू : खतप्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:30 AM

महापालिकेच्या वतीने पाथर्डीफाटा येथे सुरू करण्यात आलेल्या खतप्रकल्पावरील बंद अवस्थेत धूळ खात पडून असलेल्या मशीनरी सुरू करण्यात आल्याने खतप्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाला असून, दररोज सुमारे पन्नास टन खत तयार केले जात असल्याची माहिती नाशिक वेस्ट मॅनेजमेंटचे संचालक कर्नल सुरेश रेगे यांनी दिली.

सिडको : महापालिकेच्या वतीने पाथर्डीफाटा येथे सुरू करण्यात आलेल्या खतप्रकल्पावरील बंद अवस्थेत धूळ खात पडून असलेल्या मशीनरी सुरू करण्यात आल्याने खतप्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाला असून, दररोज सुमारे पन्नास टन खत तयार केले जात असल्याची माहिती नाशिक वेस्ट मॅनेजमेंटचे संचालक कर्नल सुरेश रेगे यांनी दिली. महापालिकेने जानेवारी २०१७ मध्ये हा खतप्रकल्प नाशिक वेस्ट मॅनेजमेंटला चालविण्यासाठी दिला. यावेळी याठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी व धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने पाथर्डीफाटा पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली होती. अशा परिस्थितीत वेस्ट मॅनेजमेंटने या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली असून, धूळ खात पडून असलेली मशीनरी व यंत्रसामग्री दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात आली. यात काही जुन्या वाहनांची दुरुस्ती आणि काही नवीन उपकरणे खरेदी करण्यात आली. कार्यान्वित करण्यात आलेल्या बायोगॅस संयंत्रात ओला सेंद्रिय कचरा वेगळा करून ट्रिटमेंट प्लॅन्टची श्रेणी सुधारित करण्यात आली. नाले स्वच्छ व दुरुस्त करण्यात आले. याबरोबरच पंधरा वर्षांपासून खतप्रकल्पावरील चार कचऱ्याच्या ढिगाºयांपैकी दोन ढिगारे नाशिक वेस्ट मॅनेजमेंटने एका वर्षात हलविले. उन्हाळ्यात कचºयाला आग लागू नये यासाठी सदर कचरा मातीने झाकण्यात आला आहे. घनकचरा २०१६ नियमानुसार डंपसाइटचे काम प्रगतिपथावर आहे. यामुळे दुर्गंधी कमी होण्यास मदत होणार असून, माती आणि भूजल दूषित होण्याचे प्रमाण कमी होणार आहे.  पूर्वी मृत प्राण्यांमुळे परिसरात दुर्गंधी होत असे. आता मृत प्राण्यांची ज्वलन दाहिनीमध्ये विल्हेवाट लावण्यात येते. याबरोबर प्लॅस्टिकचे वर्गीकरण करून प्रक्रियाद्वारे इंधन निर्मिती केली जाते व त्यापासून तयार होणारे ज्वलनशील इंधन हे डिझेलच्या जागी वापरता येत असल्याचेही कर्नल रेगे यांनी सांगितले.ग्रामस्थांकडून समाधान व्यक्तपूर्वी खतप्रकल्पातील दुर्गंधीमुळे यास कचरा डेपो म्हणण्याची वेळ आली होती. गेल्या काही महिन्यांपासून खतप्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने पूर्वी याठिकाणी निर्माण होणारा धूर व दुर्गंधी बंद झाल्याने खºया अर्थाने हा खतप्रकल्प असल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत असल्याची भावना पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात असल्याचे पंचायत समिती सदस्य रत्नाकर चुंभळे, रामचंद्र चुंभळे, एकनाथ नवले यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका