शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘दुर्गे दुर्गट भारी’... आदिशक्ती मातेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 00:53 IST

‘दुर्गे दुर्गट भारी तुजवीण संसारी अनाथ नाथे अंबे’, ‘अनादी निर्गुण प्रगटली भवानी’, जयदेवी जयदेवी सप्तशृंगी माता, उदो, उदो आंबाबाईचा, ‘माझी रेणुका माउली’, ‘जयजयकार तुळजाभवानीचा’ अशा अनेक भक्तिगीतांच्या आणि आरतीच्या गजरात आदिशक्तीचा जागर करीत नवरात्रोत्सवाला रविवारी (दि. २९) घरोघरी घटस्थापना करण्यात आली.

नाशिक : ‘दुर्गे दुर्गट भारी तुजवीण संसारी अनाथ नाथे अंबे’, ‘अनादी निर्गुण प्रगटली भवानी’, जयदेवी जयदेवी सप्तशृंगी माता, उदो, उदो आंबाबाईचा, ‘माझी रेणुका माउली’, ‘जयजयकार तुळजाभवानीचा’ अशा अनेक भक्तिगीतांच्या आणि आरतीच्या गजरात आदिशक्तीचा जागर करीत नवरात्रोत्सवाला रविवारी (दि. २९) घरोघरी घटस्थापना करण्यात आली. तसेच सार्वजनिक मंडळांच्या वतीने देवी मूर्तीची आकर्षक सजावट करून महापूजा व आरती करण्यात आली. दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच माळेला नाशिकची ग्रामदेवता कालिका मातेच्या मंदिरात तसेच गोदा घाटावरील सांडव्यावरची देवी व अन्य देवी मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच अलोट गर्दी झाली होती.नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी शहरातील मंदिरांत तसेच घरोघरी धार्मिक वातावरणात घटस्थापना झाली. सकाळी घटस्थापनेसाठी लागणारे पूजेचे साहित्य घेण्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती.शहरातील विविध भागात घटस्थापनेसाठी लागणाऱ्या साहित्यांची दुकाने थाटली होती.नाशिकची ग्रामदैवता असलेल्या कालिकामातेच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. कालिका मंदिर संस्थानच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पहाटे देवीची महापूजा करण्यात आली. आरतीनंतर भाविकांची दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी झाली होती.दरम्यान, नवरात्रोत्सवानिमित्त गोदा घाटावरील सांडव्यावरची देवी, शालिमार येथील दुर्गामाता मंदिर, भद्रकालीतील देवी मंदिर, घनकर लेन येथील तुळजाभवानी मंदिर आदी ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. पहिल्या माळेला या मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी झाली होती.बंदी डावलून दुकानेकायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर तसेच शहरातील वाहतूक व्यवस्थेचा ताण यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशसनाने कालिका यात्रेत व्यावसायिकांना दुकाने लावण्यास परवानगी नाकारली. तरीही याठिकाणी दरवर्षीप्रमाणे छोट्या व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत.

टॅग्स :Navratriनवरात्रीNashikनाशिक