सिन्नर : हायवा डंपर व स्प्लेंडर मोटारसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. सोमवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील मुसळगाव शिवारात हा अपघात झाला.सिन्नर तालुक्यातल्या कीर्तांगळी येथील शांताराम मुरलीधर चव्हाणके व सतिष भागवत जगताप हे दोघे स्प्लेंडर मोटारसायकलने (एम. एच. १५, सी. यु. ७४४५) सिन्नरच्या दिशेने येत होते. मुसळगाव शिवारातील हॉटेल आशीर्वाद जवळ आले असता सिन्नरहून शिर्डीकडे जात असलेल्या हायवा डंपरची (एम. एच. १७, ए. जी. ८४६३) त्यांना जोरदार धडक बसली. या अपघातात शांताराम चव्हाणके ठार झाले तर सतिष जगताप हे जखमी झाले. याप्रकरणी संजय चव्हाणके यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार पोलिसांनी डंपर चालक भास्कर अशोक म्हस्के (२५) रा. मऱ्हळ, ता. सिन्नर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक पुंडलीक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार डी. व्ही. लाड अधिक तपास करीत आहे.
डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
By admin | Updated: December 22, 2015 22:55 IST