शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

ड्रायपोर्टच्या कामात सेल्सटॅक्सचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:19 IST

निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या ड्रायपोर्टच्या कामात अडथळे कायम असून, कारखान्याकडे सर्वाधिक घेणे असलेल्या जिल्हा बॅँकेला जागेच्या मोबदल्यातून १०५ कोटी रुपये देण्याचा विषय मार्गी लागू पहात असतानाच आता विक्रीकर विभागाने ड्रायपोर्ट उभारण्यापूर्वी कारखान्याकडे बाकी असलेल्या सुमारे ४८ कोटी रुपयांच्या भरण्याचा मुद्दा पुढे केला आहे.

नाशिक : निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या ड्रायपोर्टच्या कामात अडथळे कायम असून, कारखान्याकडे सर्वाधिक घेणे असलेल्या जिल्हा बॅँकेला जागेच्या मोबदल्यातून १०५ कोटी रुपये देण्याचा विषय मार्गी लागू पहात असतानाच आता विक्रीकर विभागाने ड्रायपोर्ट उभारण्यापूर्वी कारखान्याकडे बाकी असलेल्या सुमारे ४८ कोटी रुपयांच्या भरण्याचा मुद्दा पुढे केला आहे. विक्रीकर कमी करण्याची तरतूद कायद्यात नसल्यामुळे आता राज्य सरकारकडे चेंडू ढकलण्यात आला असून, अन्य सरकारी देणीही कशी फेडायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.सोमवारी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येऊन त्यावर खल करण्यात आला. निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर ड्रायपोर्ट उभा करण्याचे जवळजवळ निश्चित होऊन त्यासाठी लागणाºया जागेसाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अर्थात जेएनपीटी पैसे देण्यास तयार असल्यामुळे जिल्हा बॅँकेच्या तिढ्यातून कारखान्याची सुमारे १०५ एकर जागा सुटण्याची चिन्हे असतानाच, विक्रीकर विभागाने आता ड्रायपोर्टच्या उभारणीत उडी घेतली आहे.  निफाड कारखान्याकडे सुमारे ४८ कोटी रुपये विक्रीकर थकला असून, त्याच्या वसुलीसाठी आजवर प्रयत्न झाले, परंतु हाती काहीच लागले नाही. अशा परिस्थितीत सरकारकडून उभारण्यात येणाºया ड्रायपोर्टच्या नावाने विक्रीकर वसुलीसाठी विक्रीकर विभाग सरसावला आहे. त्यांनीही आता दावा केल्यामुळे जिल्हा प्रशासनासह संबंधित यंत्रणेपुढे नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत विक्रीकर माफ करण्याची कायद्यात तरतूद नाही, अशा परिस्थितीत अंतिम निर्णय राज्य सरकारच घेणार आहे. सोमवारी झालेल्या या बैठकीत या विषयावरून बराच खल करण्यात आला. निफाड सहकारी साखर कारखान्याकडे जिल्हा बॅँकेसह अन्य शासकीय देणी मिळून सुमारे २६० कोटी रुपये घेणे असल्याने त्याची परतफेड कशी करायची असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला.या बैठकीस ज्येष्ठ नेते सुरेश बाबा पाटील, डॉ. प्रशांत पाटील, विक्रीकर विभागाचे बोंडे, जेएनपीटीचे सहायक व्यवस्थापक आर. एस. जोशी, प्रांत अधिकारी महेश पाटील आदी उपस्थित होते.तोडगा काढण्यासाठी आणखी बैठका घेणारकारखान्याच्या ताब्यातील पडीक जागेवर कर्ज प्रकरण करून ती रक्कम देणी फेडण्यासाठी वापरता येईल काय असा विचारही पुढे येऊन कायद्याच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यावर चर्चा करण्यात आली. कारखान्याकडील देणीबाबत नव्याने प्रस्ताव तयार करून तो अखेर तीन आठवड्यांत या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी आणखी बैठका घेण्याचे ठरविण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक