शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

‘सीआयएसएफ’च्या परिक्षेत डमी उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 16:54 IST

लेखी परिक्षेसाठी त्याच्या वतीने डमी उमेदवार बसविल्याचा प्रकार उघडकीस आल्याने त्याच्यासह त्या डमी उमेदवाराविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ठळक मुद्देकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल हे अर्धसैनिकांचे दल कॉन्स्टेबलची भरती प्रकीया राबविली जात आहे

नाशिक : नाशिकरोड येथील नेहरूनगरच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) मैदानावर उमेदवार भरती प्रक्रीया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेच्या लेखी परिक्षेत चक्क एक डमी उमेदवार आढळून आल्याने दोघा संशयितांविरूध्द उपनगर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल हे अर्धसैनिकांचे दल असून सरकारी कार्यालयांना सुरक्षा व संरक्षण प्रदान करणे हे या दलाचे मुख्य कार्य आहे. १९६९ साली भारतात सीआयएसफची स्थापना करण्यात आली. नाशिकरोड परिसरात भारत प्रतिभूती मुद्रणालय, चलार्थपत्र मुद्रणालयाच्या सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफकडे आहे. येथील मैदानावर स्टाफ सिलेक्शन कॉन्स्टेबलची भरती प्रकीया राबविली जात आहे. या भरतीप्रक्रियेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या लेखी परिक्षेत डमी उमेदवार आढळून आल्याने कमान्डंट परमजित सिंग (रा.नेहरूनगर), यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार संशयित उमेदवार अनिकेत कैलास जाधव (२१, रा भोकरदन, जि.बुलढाणा) याच्यासह त्याचा साथीदाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव याने आॅनलाइन पध्दतीने घेतल्या जाणा-या लेखी परिक्षेसाठी त्याच्या वतीने डमी उमेदवार बसविल्याचा प्रकार उघडकीस आल्याने त्याच्यासह त्या डमी उमेदवाराविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरिक्षक एस.जी.जगदाळे करीत आहेत.

 

टॅग्स :Nashikनाशिकexamपरीक्षाfraudधोकेबाजीPolice Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी