शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

इगतपुरीतील माऊंटन शॅडो रिसॉर्टमध्ये ‘दम मारो दम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 01:46 IST

विविध पार्ट्यांसाठी प्रसिद्ध आणि चर्चेत असलेला इगतपुरी तालुका रविवारी (दि. १३) पुन्हा एकदा हुक्का पार्टीने हादरला. तालुक्यातील त्रिंगलवाडी येथील परदेवी हद्दीतील माऊंटन शॅडो रिसॉर्टमध्ये रविवारी रात्री १ वाजेच्या सुमारास ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत २० तरुणींसह ७५ जणांना हुक्का व अमली पदार्थांचे सेवन करताना रंगेहाथ पकडले आहे. यामध्ये मुंबईसह विविध राज्यांतील नागरिकांचा समावेश आहे. सोबत १८ देहविक्रय करणाऱ्या महिलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देहुक्का पार्टीवर छापा : ७५ नागरिकांना रंगेहाथ पकडले, महिलांचाही समावेश

इगतपुरी : विविध पार्ट्यांसाठी प्रसिद्ध आणि चर्चेत असलेला इगतपुरी तालुका रविवारी (दि. १३) पुन्हा एकदा हुक्का पार्टीने हादरला. तालुक्यातील त्रिंगलवाडी येथील परदेवी हद्दीतील माऊंटन शॅडो रिसॉर्टमध्ये रविवारी रात्री १ वाजेच्या सुमारास ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत २० तरुणींसह ७५ जणांना हुक्का व अमली पदार्थांचे सेवन करताना रंगेहाथ पकडले आहे. यामध्ये मुंबईसह विविध राज्यांतील नागरिकांचा समावेश आहे. सोबत १८ देहविक्रय करणाऱ्या महिलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिंगलवाडी येथील परदेवी हद्दीतील माऊंटन शॅडो रिसाॅर्ट येथे अमली पदार्थांसह हुक्का पार्टीचे रेवती हार्डवेअर स्पेअर पार्ट या कंपनीमार्फत आयोजन करण्यात आल्याची खबर ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली. तसेच मुंबईहून देहविक्रय करणाऱ्या १८ तरुणींनाही त्या ठिकाणी आणण्यात आले होते. त्यानुसार ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (दि.१३) रात्री १ वाजेच्या सुमारास काही पंचांना हॉटेलमध्ये पाठवून खात्री करून घेतली. माहिती खरी असल्याचे लक्षात येताच पथकाने हॉटेलवर छापा टाकला. यावेळी पार्टी हाॅलमध्ये विविध टेबलवर हुक्कासह मद्यसेवन करताना काही पुरुष व महिला आढळून आल्या. पोलिसांनी यावेळी ५५ पुरुष व २० महिलांना हुक्का व अमली पदार्थांचे सेवन करताना ताब्यात घेतले. तसेच या ठिकाणावरून पोलिसांनी विदेशी दारू, हुक्के, सुगंधी तंबाखू हा मुद्देमाल हस्तगत केला. एका खोलीची तपासणी केली असता तेथे एक पुरुष व एक महिला आढळून आली. या महिलेची चौकशी केली असता तिने मुंबईहून शिल्पा उर्फ शालिहा सिराज कुरेशी व दीपाली महेश देवळेकर या १५ ते २० मुलींना देहविक्रीसाठी माऊंटन शॅडो रिसॉर्ट येथे घेऊन आल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेले नागरिक हे विविध प्रांतांतील असल्याने त्यांची ओळखपरेड करण्यातच दिवस गेला. पोलिसांनी याप्रकरणी हुक्का, सिगारेट व तंबाखू उत्पादने व अनैतिक व्यापार प्रतिबंधक आदी नियमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

 

इन्फो

 

आज न्यायालयात हजर करणार

 

पोलिसांनी हॉटेल मालक मनीष नयन झवेरीया (रा. विलेपार्ले, मुंबई), महेंद्र डोसाभाई मोमाया शाह (रा. शरणपूररोड, नाशिक) तसेच आयोजक आशिष नरेंद्र छेडा, (रा. सी ९ रंजन, एस. व्ही. रोड, दहिसर ईस्ट, मुंबई), केतन चापसी गडा, (रा. खकर अपार्टमेंट, साईनगर, कांदिवली वेस्ट, मुंबई) यांच्यासह देहविक्रीसाठी महिला पुरवणाऱ्या शालिहा उर्फ शिल्पा सिराज कुरेशी (रा. बीडीडी चाळ बी. नं. ४३, जांबोरी मैदान, मुंबई) व दिपाली महेश देवळेकर (रा. गोरेगाव, हिरामणनगर, मुंबई) यांच्यासह ७५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या सर्वांना सोमवारी (दि. १४) इगतपुरी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

 

 

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस