शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

थंडीमुळे शहरातील रोगराई अखेर संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:08 IST

पावसाळ्यासोबत आलेल्या आणि चार महिने नाशिककरांना त्रस्त करून सोडलेल्या रोगराईचे वातावरण अखेर संपुष्टात आले आहे. गुलाबी आणि आरोग्यदायी थंडीमुळे रुग्णसंख्येत घट झाली आहे. गेल्या दहा दिवसांत स्वाइन फ्लूचा फक्त एकच रुग्ण आढळला असून, डेंग्यूचे ३० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनानेदेखील सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

नाशिक : पावसाळ्यासोबत आलेल्या आणि चार महिने नाशिककरांना त्रस्त करून सोडलेल्या रोगराईचे वातावरण अखेर संपुष्टात आले आहे. गुलाबी आणि आरोग्यदायी थंडीमुळे रुग्णसंख्येत घट झाली आहे. गेल्या दहा दिवसांत स्वाइन फ्लूचा फक्त एकच रुग्ण आढळला असून, डेंग्यूचे ३० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनानेदेखील सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.  पावसाळ्यात सुरू झालेल्या रोगराईने उच्छाद मांडला होता. स्वाइन फ्लूमुळे सुमारे ६० जणांना प्राण गमवावे लागले आहेत. (यात महापालिकेच्या हद्दीबाहेरील परंतु शहरात उपचार घेताना मृत्यू पावलेल्यांचाही समावेश आहे.) गेल्या महिन्यातदेखील कधी पाऊस तर कधी कडक ऊन या वातावरणामुळे स्वाइन फ्लूच्या विषाणूंना पोषक वातावरण होते. मात्र आता बदललेल्या वातावरणाचे अनुकूल परिणाम दिसून येत आहेत. १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत स्वाइन फ्लूचा एक रुग्ण आढळला आहे. गेल्या संपूर्ण आॅक्टोबर महिन्यात एकूण ८१ रुग्ण आढळले होते. त्यातील ४० रुग्ण तरी पहिल्या पंधरवड्यात आढळले होते. तर सप्टेंबर महिन्यात १३६ रुग्ण आढळले होते. मात्र हे रुग्ण घटत गेल्यानंतर आता दहा दिवसांत केवळ एकच रुग्ण आढळला आहे. तसेच दहा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले.स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या मर्यादित मात्र मृत्यूचे प्रमाण अधिक तर डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जास्त त्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण नगण्य होते. या हंगामात डेंग्यूमुळे एकाचा बळी गेल्याची मनपात नोंद आहे. तथापि, रुग्ण संख्या मात्र अधिक होती. यंदा दहा दिवसांत ३० रुग्ण आढळले असले तरी यापूर्वी म्हणजे गेल्या महिन्यात १२७ तर सप्टेंबर महिन्यात १६५ रुग्ण आढळले होते. रुग्ण संख्या घटल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. प्रशासन सातत्याने रोषाला सामोरेशहरातील रोगराईमुळे प्रशासनाला सातत्याने रोषाला सामोरे जावे लागत होते. गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत रोगराई याच विषयावर प्रशासनाला धारेवर धरण्यात आले होते. तर पंचवटीतील एका नगरसेवकाच्या सासऱ्याला डेंग्यू होऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराम कोठारी व एका वैद्यकीय अधिकाºयाच्या निलंबनाचा ठराव महासभेत करण्यात आला होता. डॉ. कोठारी यांचे निलंबन झाले नसले तरी त्यांना पदावनत करून बदली करण्यात आल्याने त्यांचे बोटावर निभावले होते. तर महापालिकेला जनजागृती मोहीमही राबविण्यात आली आहे.

टॅग्स :environmentवातावरणHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल