शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

नाशिक लगत भुकंपाचे धक्के बसल्याने घबराहट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 15:39 IST

सकाळी ९ वाजुन ४४ मिनीटे ३१ सेकंदाच्या दरम्यान, जवळपास १९५ सेकंद इतक्या कालावधीत भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. नाशिक शहरापासून ४० किलो मीटर अंतरावर हे धक्के बसल्याचा प्राथमिक अंदाज असून,

ठळक मुद्दे४० किलो मीटरचा परिघ : सुदैवाने नुकसान नाहीरिस्टल स्केलवर भुकंपाची तीव्रता ३.२ इतकी

नाशिक : कळवण तालुक्यातील दळवट, लिंगामे आदी गावांना काही दिवसांपुर्वी बसलेल्या भुकंपाच्या धक्क्याने भितीचे सावट कायम असताना सोमवारी सकाळी नाशिकपासून ४० किलो मीटरच्या परिघात एका पाठोपाठ तीन भुकंपाचे धक्के बसले आहेत. भुकंपाची तीव्रता फारशी नसली तरी, नाशिकच्या जवळच हे धक्के जाणवल्याने शहरवासियांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे. रिस्टल स्केलवर भुकंपाची तीव्रता ३.२ इतकी असल्याने त्याची नोंद मेरीच्या केंद्रावर झाली आहे.सकाळी ९ वाजुन ४४ मिनीटे ३१ सेकंदाच्या दरम्यान, जवळपास १९५ सेकंद इतक्या कालावधीत भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. नाशिक शहरापासून ४० किलो मीटर अंतरावर हे धक्के बसल्याचा प्राथमिक अंदाज असून, साधारणत: पेठ, सुरगाणा, हरसूल या भागात त्याचा केंद्रबिंदु असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साधारणत: ३.२ रिस्टल स्केलची तीव्रता या धक्क्यांची असल्याने जमीनीला हादरे बसल्याचे तसेच भिंती व दरवाजे, खिडक्यांचे तावदाने हलल्याचे सांगण्यात आले. साधारणत: तीन मिनीटांच्या कालावधीत जमीन हादरली. त्यानंतरही काही कालावधीनंतर दोन धक्के बसले आहेत. त्याची तीव्रता मात्र १.३ व १.६ रिस्टल स्केल इतकी आहे. त्यामुळे फारसे काही जाणवले नाही. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुका भुकंपप्रवण म्हणून नोंदविला गेला असून, याठिकाणी अधुन मधून भुकंपाचे धक्के जाणवत असल्याने तेथील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण कायम आहे. या भागात नेहमीच बसणाºया भुकंपाच्या धक्क्यामागील कारणे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नसून, त्यासाठी दिल्ली व हैद्राबादच्या भुगर्भशास्त्रज्ञांना देखील पाचारण करण्यात आले आहे, परंतु त्याचा उलगडा होऊ शकलेला नाही. आता नाशिक शहरापासून अवघ्या ४० किलो मीटर परिसरापर्यंत धक्के जाणवल्याने नाशिककरांच्या पोटात भितीचा गोळा उठणे साहजिकच असले तरी, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी बसलेल्या भुकंपाच्या धक्क्यांचे ठिकाण शोधण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.

टॅग्स :EarthquakeभूकंपNashikनाशिक