शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
9
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
11
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
12
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
13
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
14
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

दुबार पेरणीचे संकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:45 IST

गेल्या दोन महिन्यांपासून गायब झालेला पाऊस गुरुवारी (दि.१६) सकाळपासून बरसायला सुरुवात झाली. येवला तालुक्यात अनेक भागात मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड परिसरातील खरीप हंगामातील मका, सोयाबीन, कपाशी, भुईमूग आदी पिकांना यामुळे जीवदान मिळाले आहे.

येवला : गेल्या दोन महिन्यांपासून गायब झालेला पाऊस गुरुवारी (दि.१६) सकाळपासून बरसायला सुरुवात झाली. येवला तालुक्यात अनेक भागात मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड परिसरातील खरीप हंगामातील मका, सोयाबीन, कपाशी, भुईमूग आदी पिकांना यामुळे जीवदान मिळाले आहे.पावसाअभावी तालुक्यातील सुकण्यास, करपण्यास सुरु वात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. त्यामुळे उशिरा का होईना आलेल्या या पावसामुळे पिकांना अशंत: जीवदान मिळाले असून, सुकलेली मका, सोयाबीन पिके या पावसाने हिरवीगार व टवटवीत झाल्याचे चित्र आहे. जून महिन्यात मृग नक्षत्रात पडलेल्या पावसाच्या भरवशावर खरीप हंगामातील पिकांची पेरणी बळीराजाने मोठ्या उत्साहात केली होती. मुसळधार पडलेला पाऊस व हवामान खात्याने वर्तवलेल्या दमदार पावसाच्या अंदाजाने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र पावसाने ओढ दिल्याने येवला तालुक्यातील संपूर्ण भागात दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. कोटमगाव येथील शेतकरी राजेंद्र कोटमे यांनी आपल्या साडेतीन एकर सोयाबीन पिकात पावसाअभावी नांगर फिरवला होता. मागील दहा-बारा दिवसांपूर्वी कोटमगाव परिसरात साठ ते सत्तर टक्के शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. येथील मका, सोयाबीनसारखी पिके उन्हाच्या झळा सोसून सुकली होती, तर काही पिके करपण्यास सुरुवात झाली होती. मानोरी येथील एक-दोन शेतकºयांनी मका पिकावर नांगर फिरवला होता. परंतु १६ आॅगस्टला झालेल्या पावसाने येवला तालुक्यावरील दुबार पेरणीचे संकट पुढचे काही दिवस टळले असल्याने शेतकरी या पावसामुळे सुखावल्याचे बघायला मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून शेतकरी पुन्हा मशागतीची कामे करताना दिसत आहे. मका व सोयाबीनला युरिया टाकताना दिसत आहे. या पावसामुळे जमिनीत काही प्रमाणात ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतातील सुकलेली पिके हिरवीगार दिसत आहे. या पावसाने काही दिवसापुरते पिकांना जीवदान दिले असून, काही भागातील वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.शेतातील विहिरी अजूनही कोरड्याठाक आहेत.येवला तालुक्यातील बाभूळगाव येथील कार्यान्वित असलेली ३८ गाव पाणीपुरवठा योजनेमुळे काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र वाड्या-वस्त्यांवर विदारक चित्र निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात बºयापैकी पडलेल्या पावसाने पालखेड डाव्या कालव्यातून येवला तालुक्यात आवर्तन सुरू आहे. या आवर्तनातून पश्चिम भागातील गोई नदीला पाणी सोडण्यात यावे तसेच वितरिका नंबर २१,२५ आणि २८ ला या आवर्तनातून चाºयांना पाणी सोडावे. या वितरिका आणि बंधारे भरल्याने विहिरींना पाणी उतरण्यास मदत होऊन पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होणार असल्याने या वितरिका आणि बंधारे पालखेडच्या आवर्तनातून भरून मिळावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.पिके झाली हिरवीगारदीड महिन्यापासून शेतात जावे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सुरु वातीच्या पावसाने उतरलेली खरीप पिके दीड महिन्यापासून पाण्याविना सुकल्याने करपू लागली होती. परंतु या थोड्या प्रमाणात पडलेल्या पावसाने खरीप पिके हिरवीगार झाल्याने दुबार पेरणीचे संकट तूर्तास तरी टळले आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक