नायगाव : ग्रामीण भागात शासकीय कामे सुलभ व सुरळीत होऊन वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी सर्वच क्षेत्रात आनलाईन कामकाज सुरू करण्यात आले. मात्र वारंवार होणाºया सर्व्हर डाऊनमुळे ही सेवा सध्या ग्रामस्थांची चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. याच सर्व्हरमुळे शुक्रवारी तालुक्यातील नायगाव खोºयातील अनेक महिलांचा रोजगार बुडाल्याने सर्व्हरच्या नावाने या महिलांनी चक्क बोटे मोडत तीव्र संताप व्यक्त केला.शुक्र वारी सकाळी ८ वाजेपासून नायगाव येथील शेकडो महिला गोदा युिनयनच्या स्वस्त धान्य दुकाना समोर रेशनसाठी रांगेत उभ्या होत्या. मात्र रेशन दुकानदार धान्य वाटप सुरू करत नसल्यामुळे महिलांनी वाटप सुरू करण्यास विनंती केली. मात्र दुकानदाराने सर्व्हर सुरू होत नसल्याचे सांगितले. हळू-हळू ग्राहकांची रेशनसाठी गर्दी वाढू लागली. साडेनऊ वाजूनही वाटप सुरू झाले नसल्याने महिलांनी पुन्हा वाटपाबाबत विचारणा केली. तेव्हाही अजून सर्व्हर डाऊनच असल्याचे सांगितले .दोन तास रांगेत उभ्या असलेल्या महिलांनी उन्हाच्या त्रासामुळे हातातील पिशवी व रेशनकार्ड रांगेत ठेवत जवळच्या झाडाच्या सावलीत विसावा घेतला.
नायगाव खोऱ्यात सर्व्हर डाऊनमुळे सर्वच कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 17:54 IST