Due to the repair of down railway line it is possible to clear the railway line from noon | डाऊन रेल्वे मार्ग दुरुस्त झाल्याने दुपारपासून रेल्वे मार्ग सुरळीत
डाऊन रेल्वे मार्ग दुरुस्त झाल्याने दुपारपासून रेल्वे मार्ग सुरळीत

ठळक मुद्दे डाउन रेल्वेलाईनद्वारे दुपारपासुन गाड्या सुरू झाल्या आहेत,

इगतपुरी : अंतोदय एक्सप्रेसचा डबा रुळावरुन घसरल्याने रेल्वे वाहतुक काही वेळ रोखण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाने डबे सुरळीत करुन रेल्वे वाहतुक पुर्वपत केली.
गुरुवारी (दि.१८) पहाटे अंतोदय एक्सप्रेसचा कसारा घाटातील भीमा या ब्रिटीशकालीन पुलाजवळ मागुन दुसरा प्रवाशी डबा रुळावरून घसरला होता. मात्र रेल्वे प्रशासनाने मोठया प्रयत्नाने या भीमा पुलावर जॅकच्या साहाय्याने रेल्वे रुळावरून घसरलेला डबा पुन्हा रेल्वे लाईनवर आणुन संपूर्ण गाडी दुपारी इगतपुरी रेल्वे स्थानकात आणुन एक्सप्रेसचे मागील दोन डबे इगतपुरी स्थानकात तपासणीकरिता काढले. त्यानंतर अंतोदय एक्सप्रेस सायंकाळी ५.३० वाजता मनमाडच्या दिशेला रवाना करण्यात आली. तर डाउन रेल्वेलाईनद्वारे दुपारपासुन गाड्या सुरू झाल्या आहेत, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.


Web Title:    Due to the repair of down railway line it is possible to clear the railway line from noon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.