शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

दंड वसुलीसाठी वाहनधारक वेठीस वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष वसुली मात्र जोरात नाकाबंदी कसली, ही तर ‘वसुली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:37 IST

वेळ : रात्री १२.२० वाजेची. स्थळ : शालिमार चौक. बॅरिकेड्स टाकून नाकाबंदी सुरू असते. दुचाकी, चारचाकी वाहनांना अडवून त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली जाते

ठळक मुद्दे नाकाबंदी नेमकी सुरक्षिततेसाठी की आर्थिक कोंडीसाठी मध्यरात्री पावती फाडण्याचे निमित्त मद्यपी चालकाला सोडूल देण्यात आले

नाशिक : वेळ : रात्री १२.२० वाजेची. स्थळ : शालिमार चौक. बॅरिकेड्स टाकून नाकाबंदी सुरू असते. दुचाकी, चारचाकी वाहनांना अडवून त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली जाते आणि कागदपत्रे असतील तर हेल्मेटची विचारणा होते. दोन्ही असेल तर पीयूसी, इन्शुरन्सचीही मागणी केली जाते. थोडक्यात काय तर पावती फाडण्यासाठी कोणतेही कारण पुढे करून दंडवसुली हेच एकमेव उद्दिष्ट. असे असेल तर मग नाकाबंदी नेमकी सुरक्षिततेसाठी की आर्थिक कोंडीसाठी असा प्रश्न अनुत्तरीत राहतो.रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान पोलिसांच्या ताफ्याकडून वाहनांची तपासणी केली जात होती. एका मद्यधुंद चारचाकी वाहनधारकाला अडविण्यात आल्यानंतर त्याच्याकडून दंड वसूल करण्यात आला. अन्य काही दुचाकीस्वारांनी दंडाची आकारणी करण्यात आली. कुणी पोलिसांना जाब विचारला की कलमांची धमकी देऊन कोणतेही कलम लावता येऊ शकते, असे सांगून अनेकांना भीतीही घातली जात होती. वास्तविक नाकाबंदी असेल तर फक्त वाहनांची झडती घेऊन त्याबाबतची माहिती ठेवली जाणे अपेक्षित असताना केवळ मध्यरात्री पावती फाडण्याचे निमित्त शोधले जात होते.प्रसंग-१ वेळ रात्री १२.१५रस्त्याने जाणाºया एका दुचाकीस्वाराला अडवून नाकाबंदीतील एका अतिउत्साही पोलीस कर्मचाºयाने दुचाकीस्वाराकडे लायसन्सची मागणी केली. लायसन्स मिळाल्यानंतर मोठी कामगिरी फत्ते केल्याचा आविर्भाव चेहºयावर आणून ते लायसन्स त्याने आपल्या साहेबांकडे सुपूर्द केले. त्यानंतर या पोलिसाने दुचाकीचेही छायाचित्र काढले. त्याने नंतर कागदपत्रांची मागणी केली. कागदपत्रे नाही म्हटल्यावर हेल्मेटची विचारणा केली. कागदपत्रे नसल्याचे २०० आणि हेल्मेट नसल्याचे ५०० रुपयांची पावती फाडण्यास चालकास भाग पाडले. नाकाबंदीत संशयास्पद वाहनांची, व्यक्तींची चौकशी केली जाते. प्रसंगी वाहन जप्तही केले जाते. परंतु येथे या साºया प्रकाराला फाटा देत दंड भरल्यास दारू पिऊन गाडी चालविणाºयालाही अभय मिळते. भले पुढे जाऊन त्याने अपघात केला तरी चालणारे असते. नाकाबंदी नेमकी का आणि कशासाठी केली जाते, याचे कोणतेही भान न राखता येथील अधिकारी, कर्मचारी दुचाकीस्वार चोरच आहेत, अशा आविभार्वात पोलीस बोलत होते. विशेष म्हणजे डोक्यावर मंकी कॅप आणि मफलर गुंडाळलेल्या या पोलिसांकडे मात्र हेल्मेट नव्हते.प्रसंग- २ वेळ रात्री १२.२५एका मद्यधुंद कारचालकाला अडवून त्याच्याकडून पोलीसांनी पावती फाडली. त्यानंतर या मद्यपी चालकाला सोडूल देण्यात आले. खरेतर अशा परिस्थितीत अपघातास कारणीभूत ठरू शकणाºया आणि त्याच्यामुळे इतरांचा जीवही धोक्यात येण्याची शक्यता गृहीत धरून कारचालकाचे वाहन जप्त करणे अपेक्षित होते. परंतु पोलिसांना फक्त दंडाची रक्कमच महत्त्वाची वाटल्याने त्याच्याकडून केवळ दंड वसूल करण्यात आला. वास्तविक मद्यपी वाहनचालकाला अशा अवस्थेत सोडणे उचित अजिबात नव्हते. तरीही पोलिसांनी सोपस्कार पूर्ण करीत कारचालकाला सोडून दिले. पुढे याच कारचालकाने अपघात केला असता तर? परंतु पैसे दिल्यानंतर मद्यपीदेखील पोलिसांना सज्जन वाटू लागतात. असाच काहीसा प्रकार शालिमार चौकात कारचालकाच्या बाबतीत घडला.प्रसंग- ३ वेळ रात्री १२.३५शालिमार चौकात नाशिकरोडच्या एका रिक्षाचालकाला अडविल्यानंतर येथील अधिकाºयाने त्याच्याकडे लायसन्स आणि नंतर कागदपत्रांची मागणी केली. परंतु त्याने कागदपत्रे गाडीत असल्याचे सांगताच, तुझ्या चेहºयाकडे पाहून तू खरे बोलत आहेस असे वाटते म्हणून त्यास सत्यतेचे सर्टिफिकेट देऊन टाकले. वरून तुम्ही नाशिकरोडचे रिक्षाचालक खूप माजलेले आहेत, नाशिकरोडला एकाच नंबरच्या अनेक रिक्षा चालतात, असे त्यास सुनावले. असा प्रकार सुरू असल्याचे माहिती असेल तर मग महाशयांनी कारवाई करावी ना. त्या रिक्षाचालकाला सुनावण्याचे काय कारण हे उपस्थिताना कळले नाही. मात्र त्या अधिकाºयाने बºयाच बढाया मारून घेतल्या.