शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस उघडल्याने बळीराजांची कामाची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 16:37 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या पावसाने उघडीप दिल्याने बळीराजांची इतर कामांची लगबग सुरू झाली आहे. परंतु प्रत्येक पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण निर्माण झाल्याने शेतकरी वर्गाची डोकेदुखी वाढली आहे.

ठळक मुद्देलखमापूर : पिकांतील तण ठरतेय बळीराजांची डोकेदुखी

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या पावसाने उघडीप दिल्याने बळीराजांची इतर कामांची लगबग सुरू झाली आहे. परंतु प्रत्येक पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण निर्माण झाल्याने शेतकरी वर्गाची डोकेदुखी वाढली आहे.दिंडोरी तालुक्यात संततधार होणारा पाऊस यामुळे शेतकरी वर्गाचे बरीच कामे बाकी होती. परंतु आता पावसाने उघडीप दिल्याने शेतातील इतर कामे करण्यासाठी बळीराजांची लगीन घाई सुरू झाली आहे. त्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामातील पिकांमध्ये तण मोठ्या प्रमाणावर झाल्याने ते काढण्यासाठी शेतकरी वर्गाची मोठी धावपळ होत आहे. सततधार पावसामुळे तण काढण्यासाठी तेवढा पुरेसा वेळ न मिळाल्याने बऱ्याच पिकामध्ये तण मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसून येत आहे.टमाटा पिकामधील तण, सोयाबीन आदी पिकांमधील तण काढण्यासाठी शेतकरी वर्गाला मजुरांचा शोध घ्यावा लागत आहे. संततधार पावसाने रिपरिप झाल्याने मजुर वर्ग मिळणे कठीण होऊन बसले आहे. जरी मजुर वर्ग उपलब्ध झाला तर मजुरीचा जादा मोबदला द्यावा लागत आहे. पावसाने खरीपातील पिकाला काही ठिकाणी जीवदान दिले. तर काही ठिकाणी पिकांचे अतोनात हाल झाले आहे.भाजीपाला पिकांला यंदाचा पावसाचा लहरीपणा खुप नडला आहे. महागडी बियाणे खरेदी करून शेतकरी वर्गाने भाजीपाला पिकांला पसंती दिली. परंतु अगोदरच्या काळात कमी पाऊस व नंतरच्या काळात मात्र पावसाची सततधार यामुळे शेतकरी वर्गाने जे भाजीपाला पिके घेतले, त्यावर पुर्णपणे कुºहाड कोसळली.१) सततधार पावसामुळे यंदा खरीप हंगामातील पिकांमध्ये तण मोठ्या प्रमाणात उगवल्याने शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे.२) टमाटा पिकामधील निंदणीसाठी मजुरांची कमतरता.३) मजुरीसाठी दुप्पट भावाची आकारणी.४) पिके व भाजीपाला वाचविण्यासाठी बळीराजांची कसरत.यंदा खरीपांच्या मध्यंतरानंतर पावसाने संततधार स्वरु प धारण केल्यामुळे पिकाला अथवा भाजीपाल्यावर औषधे, तणनाशक औषधे फवारणी न करता आल्याने यंदा सर्व खरीपांच्या पिकांमध्ये तणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु आता पावसाने उघडीप दिल्याने सर्व कामे पुर्ण करण्यासाठी आम्ही जीवाचे रान करून पिके वाचविणार आहे.- धनंजय दाते, शेतकरी, परमोरी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी