शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे व्हील कारखान्यामुळे नाशिकच्या उद्योगाला मिळेल गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 01:58 IST

नाशिकमध्ये सुरू होत असलेल्या रेल्वे व्हील कारखान्यामुळे रेल्वेबरोबरच नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रालादेखील चालना मिळेल, महाराष्टÑासाठी रेल्वेकडून मिळालेल्या निधीचादेखील विकासाला हातभार लागणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रममंत्री अनंत गिते यांनी केले.

ठळक मुद्देअनंत गिते : रेल्वे ट्रॅक्शन मशीन कारखाना भूमिपूजनप्रसंगी प्रतिपादन

नाशिकरोड : नाशिकमध्ये सुरू होत असलेल्या रेल्वे व्हील कारखान्यामुळे रेल्वेबरोबरच नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रालादेखील चालना मिळेल, महाराष्टÑासाठी रेल्वेकडून मिळालेल्या निधीचादेखील विकासाला हातभार लागणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रममंत्री अनंत गिते यांनी केले.एकलहरारोड येथील रेल्वे ट्रॅक्शन मशीन कारखाना विस्तारीकरण अंतर्गत रेल्वे व्हील निर्मिती व रिपेअरिंग कारखान्याचे भूमिपूजन गुरुवारी दुपारी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्या हस्ते व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्याप्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी बोलताना गिते म्हणाले की, तत्कालीन दिवंगत रेल्वेमंत्री मधु दंडवते यांनी १९८१ मध्ये रेल्वे ट्रॅक्शन कारखान्याची स्थापना केली. याकरिता २५० एकर जागा शेतकऱ्याकडून घेण्यात आली. मात्र दंडवतेनंतर ३२ वर्षे इतर राज्याचे रेल्वेमंत्री झाल्याने त्यांनी आपापल्या राज्यात रेल्वेचे प्रकल्प नेले. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व आताचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे महाराष्टÑातील असल्याने गेल्या चार वर्षात महाराष्टÑात रेल्वेच्या विकासाला मोठा निधी उपलब्ध झाल्याने चालना मिळाली असे यांनी स्पष्ट केले.सर्वच रेल्वे इलेक्ट्रिकल होत असल्याने व्हील, सांगाडे आदी गोष्टी भविष्यात लागणार आहे. त्यामुळेच ५०० व्हील्स तयार व दुरुस्ती करणारा कारखाना येथे उभा राहत आहे. त्याकरिता ५२ कोटी रुपयांची तरतूद केल्याचे गिते यांनी सांगितले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे म्हणाले की, पुढील काळात नाशिक, पुणे, नगर, औरंगाबाद हे इंडस्ट्रियल कॅरिडोर राहणार आहे.यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, आमदार नरेंद्र दराडे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, भाजपा ग्रामीण जिल्हाप्रमुख दादा जाधव, रेल्वे भुसावळ विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा, महिला आघाडीच्या सत्यभामा गाडेकर, सचिन मराठे, महेश बडवे, अजय बोरस्ते, विलास शिंदे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत बाळापुरे, कामगार नेते जगदीश गोडसे यांनी केले. आभार मुख्य कारखाना प्रबंधक अनिलकुमार अग्रवाल यांनी मानले.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वेAnant Geeteअनंत गीते