शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

जुन्या घंटागाड्यांचे आयुर्मान संपुष्टात

By admin | Updated: September 4, 2016 01:05 IST

महापालिका : मक्तेदारांना नवीन घंटागाड्या खरेदी करणे अपरिहार्य

 नाशिक : महापालिकेच्या मालकीच्या घंटागाड्यांचे आयुर्मान संपल्यानंतर त्या बदल्यात नवीन वाहन मक्तेदाराने तत्काळ स्वखर्चाने रस्त्यावर आणले पाहिजे, अशी अट निविदाप्रक्रियेत घालण्यात आली असली तरी स्थायी समितीने सर्वच्या सर्व २५२ घंटागाड्या नवीनच असल्या पाहिजेत, असा आदेश काढला आहे. मनपाच्या १२१ घंटागाड्या खरेदी करून आठ वर्षे उलटली असून वाहनांची ‘खटारा’ स्थिती बनलेली आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत मक्तेदारांना नवीन घंटागाड्या खरेदी करणे अपरिहार्य बनले आहे. महापालिकेने सन २००८ मध्ये स्वमालकीच्या १२१ घंटागाड्या खरेदी केल्या होत्या. त्यासाठी त्यावेळी साडेसात कोटी रुपये मोजण्यात आले होते. घंटागाड्या घेतल्यानंतर ठेक्यावरून वाद झडल्याने त्या सुमारे दीड वर्ष एकाच ठिकाणी वापराविना पडून होत्या. गाड्या एकाच ठिकाणी राहिल्याने अनेक गाड्यांना गंज तसेच टायर निकामी झाले होते. या प्रकरणी महासभेत वारंवार प्रशासनाला धारेवर धरले जात होते. गाड्यांचे पासिंगही सुमारे वर्षभरानंतर करण्यात आले होते. दरम्यान, घंटागाड्यांचा ठेका दिल्यानंतर मक्तेदारांना मनपाच्या मालकीची ही वाहने प्रतिमाह भाड्याने देण्यात आली. तेव्हापासून गाड्या मक्तेदाराकडून वापरल्या जात आहेत. कचरा संकलन करणाऱ्या वाहनांचे सर्वसाधारणपणे आयुर्मान हे ७ ते ९ वर्षे असते. त्यामुळे मनपाच्या घंटागाड्यांचे आयुर्मान कधीच संपुष्टात आले आहे. ज्या गाड्यांची देखभाल-दुरुस्ती नियमित होत असेल त्याच गाड्या फारतर वर्षभर चालू शकतील. परंतु, रस्त्यावर धावणाऱ्या घंटागाड्यांची एकूणच ‘खटारा’ स्थिती पाहता त्यांचा वापर होणे अवघडच मानले जात आहे. स्थायी समितीने घंटागाड्यांचा पाच वर्षांसाठी ठेका मंजूर केला आहे. निविदाप्रक्रियेत टाकण्यात आलेल्या अटीनुसार घंटागाड्यांचे आयुर्मान संपल्यानंतर त्याबदल्यात नवीन वाहने मक्तेदाराने तत्काळ खरेदी करावयाची आहेत. काही घंटागाड्या सुस्थितीत असल्याचे दाखविण्यात आले तरी त्यांचा फारतर आणखी वर्षभराच्या कालावधीसाठी वापर करता येऊ शकेल. परंतु कोणत्याही स्थितीत मक्तेदारांना नवीनच घंटागाड्या खरेदी करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. स्थायी समिती सभापती सलीम शेख यांनी नवीन घंटागाड्याच धावल्या पाहिजेत, असा आदेश काढल्याने त्यानुसार कार्यवाही करण्याची जबाबदारीही आरोग्य विभागावर येऊन पडली आहे. स्थायीकडून घंटागाडीच्या ठेक्याचा ठराव आल्यानंतर पुढे तीन आठवड्याने प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली जाणार असल्याचे आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)