शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांच्या मतदार याद्यांवर हरकतींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 01:47 IST

सहकार क्षेत्रातील निवडणुकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या सहकार प्राधिकरणाने बाजार समित्यांच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या कायद्यात केलेले बदल यंत्रणेसाठी डोकेदुखी ठरले असून, शेतजमिनीच्या संयुक्त खातेदारांना मतदानाचा हक्क डावलण्यात आल्याने सटाणा व नामपूर बाजार समित्यांच्या प्रारूप मतदार यादीवर सुमारे तीनशे हरकती दाखल करण्यात आल्या आहेत.

नाशिक : सहकार क्षेत्रातील निवडणुकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या सहकार प्राधिकरणाने बाजार समित्यांच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या कायद्यात केलेले बदल यंत्रणेसाठी डोकेदुखी ठरले असून, शेतजमिनीच्या संयुक्त खातेदारांना मतदानाचा हक्क डावलण्यात आल्याने सटाणा व नामपूर बाजार समित्यांच्या प्रारूप मतदार यादीवर सुमारे तीनशे हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान, संयुक्त खातेदारांना मतदानाचा हक्क बहाल करण्याबाबत सहकार आयुक्तांनी फक्त तोंडी आदेश काढले परंतु लेखी स्वरूपात कोणत्याही सूचना प्राप्त न झाल्याने आता याबाबत थेट शासनाकडेच मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. नवीन सहकार कायद्यान्वये बाजार समिती कार्यक्षेत्रात स्वत:ची शेतजमीन असलेल्या प्रत्येक शेतकºयास मतदानाचा हक्क बहाल करण्यात आला असून, त्यासाठी किमान दहा गुंठे जमीन ताब्यात असल्यास अशा शेतकºयाला मतदार म्हणून नोंदविण्यात येणार आहे. परंतु बहुतांशी शेतजमिनींवर कुटुंबातील एकापेक्षा अनेक व्यक्तींची नावे असल्यामुळे त्यापैकी नेमके कोणाला मतदार म्हणून घोेषित करावे याबाबत सहकार खात्याकडून कोणत्याही स्पष्ट सूचना नाहीत. परिणामी एप्रिल-मे महिन्यात निवडणूक होऊ पाहणाºया जिल्ह्णातील सटाणा व नामपूर या दोन बाजार समित्यांच्या प्रारूप मतदार याद्या तयार करताना यंत्रणेला विलंब झाला. यासंदर्भात येणाºया अडचणी वेळोवेळी सहकार आयुक्तांना कळविण्यात आल्यावर डिसेंबर महिन्यात पुण्यात झालेल्या सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दहा गुंठ्यापेक्षा जास्त जागा असलेल्या प्रत्येकाला मतदार म्हणून नोंदविण्यास हरकत नसल्याचा निर्वाळा उपजिल्हा निवडणूक अधिकाºयांना दिला होता. त्यामुळे प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या. आता मात्र या याद्यांमध्ये नाव नसल्याच्या तक्रारी शेतकºयांनी केल्या आहेत. नामपूर बाजार समितीसाठी ५६ हरकती शुक्रवारअखेर प्राप्त झाल्या, तर सटाणा बाजार समितीसाठी सुमारे अडीचशे हरकती दाखल झाल्याचे सांगण्यात आले.सुनावणीनंतर अंतिम यादीयात प्रामुख्याने संयुक्त खातेदारांच्याच हरकती असून, मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याबरोबरच बाजार समिती कार्यक्षेत्रात शेतजमीन असून, निव्वळ रहिवास ठिकाण कार्यक्षेत्राच्या बाहेर असल्यामुळे मतदार यादीत नाव न टाकल्याच्या हरकतीही मोठ्या प्रमाणात आहेत. या हरकतींची सुनावणी केल्यानंतर १३ मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तत्पूर्वी सहकार आयुक्तांनी संयुक्त खातेदारांची मतदार म्हणून नोंदणी करण्याबाबत तोंडी दिलेले आदेश लिखित स्वरूपात न दिल्यामुळे हरकतींच्या सुनावणीवरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे आता शासनाकडे यासंदर्भात मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.

टॅग्स :market yardमार्केट यार्डElectionनिवडणूक