शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मनसेचा एकही उमेदवार नसल्यामुळे पंचाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:32 IST

मात्र यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकाही उमेदवाराचा अर्ज नसल्याने मनसेचे इंजिन कसारा घाटात थांबले की काय? अशी चर्चा आता शहरात होऊ लागली आहे.यामुळे मनापासून काम करणाºया कार्यकर्त्यांची पंचाईत झाली आहे. इगतपुरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले.

घोटी : मात्र यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकाही उमेदवाराचा अर्ज नसल्याने मनसेचे इंजिन कसारा घाटात थांबले की काय? अशी चर्चा आता शहरात होऊ लागली आहे.यामुळे मनापासून काम करणाºया कार्यकर्त्यांची पंचाईत झाली आहे. इगतपुरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले.  मनसेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष याच तालुक्याचे असताना सुद्धा यंदा मनसेचे उमेदवार का उभे केले नाही. याचे उत्तर मात्र, गुलदस्त्यात आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत घोटी गटातून मनसेच्या जिल्हा उपाध्यक्षांचा थोड्याच मतांमुळे पराभव झाला. तालुक्यात मनसेची मोठी ताकद असताना शहरात मात्र मनसेचे पदाधिकारीच शिल्लक राहिले नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे शहरात राष्ट्रवादी पक्षाप्रमाणे मनसेची खळखळ झाली असल्याचे राजकीय पक्षातून बोलले जाते.गत पंचवार्षिक निवडणुकीत मनसेने आपले नशीब आजमविले होते. अनेक प्रभागात त्यांच्या उमेदवारांना बºयापैकी मतदान झाले होते; मात्र गेल्या वर्षभरापासून मनसेच्या अनेक पदाधिकाºयांनी दुसºया पक्षात प्रवेश केला. तर अनेक पदाधिकारी निवडणुकीसाठी इच्छुक होते; मात्र गेल्या वर्षभरापासून मनसेच्या पदाधिकाºयांची कधी बैठकच झाली नसल्याचे बोलले जात आहे. तर वरिष्ठांनीदेखील तसे नियोजन घेण्याची तसदी घेतलीच नसल्याने शहरात मनसे पक्षाची घरघर  झाली असून, शहरात राष्ट्रवादीप्रमाणे मनसे पक्षाचेही अस्तित्व संपले आहे की काय? अशी चर्चा राजकीय पक्षांसह सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. मनसे जिल्हाध्यक्ष यांची भूमिकेबाबत नाराजी यंदाची इगतपुरी नगर परिषदेची निवडणूक ही बहुचर्चित झाली असून, गेल्या पंचवीस वर्षांत प्रथमच शिवसेनेच्या एकाधिकार शाहीसमोर सर्वच राजकीय पक्षांनी आवाहन उभे केले असल्याने ही निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. त्यात इगतपुरी शहरास विकासाच्या दृष्टीने वीस वर्ष मागे नेणाºया नेतृत्वास त्याची जाणीव करून देण्याची वेळ शहरवासीय साधत असताना मात्र मनसेचे जिल्हाध्यक्ष हे त्यास पूरक भूमिका घेत पाठबळ देऊन असल्याची चर्चा मनसे कार्यकर्तेच करत असल्याने याकडे पक्षाच्या वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज मनसे कार्यकर्ते व्यक्त करत आहे. मनसेसाठी शहरात पूरक वातावरण असताना जिल्हाध्यक्ष दुसºया पक्षास पूरक भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकnagaradhyakshaनगराध्यक्ष