शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सनदी लेखापालांच्या अधिकारांवरील मर्यादामुळे घडतात बँकीग क्षेत्रात घोटाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 14:28 IST

सनदी लेखापाल हे केवळ लेखानोंद पुस्तकांची पडताळी करून त्यातील त्रूटी व उणीवा संबधित अस्थापनांच्या लक्षात आणून देत असतात. परंतु त्यांना यातील त्रूटी व चुंकांची चौकशी करण्याचे कोणतेही अधिकार नसल्याने पीएनबी बँके सारखे घोटाळे होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सनदी लेखापाल तथा इंन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल छाजेड यांनी केले.

ठळक मुद्देघोटाळ्यांना अंतर्गत कार्यप्रणालीच जबाबदारसनदी लेखापालांच्या अधिकारांवर मर्यादासीएंना चौकशीचा नव्हे, पडताळणीचा अधिकारसीए इन्स्टिट्यूटचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल छाजेड यांचे मत

नाशिक : सनदी लेखापाल हे केवळ लेखानोंद पुस्तकांची पडताळी करून त्यातील त्रूटी व उणीवा संबधित अस्थापनांच्या लक्षात आणून देत असतात. परंतु त्यांना यातील त्रूटी व चुंकांची चौकशी करण्याचे कोणतेही अधिकार नसल्याने पीएनबी बँके सारखे घोटाळे होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सनदी लेखापाल तथा इंन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल छाजेड यांनी केले.इंन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या नाशिक शाखेत बँकीग ऑडिट विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेतील चर्चासत्रत मार्गदर्शन करण्यासाठी छाजेड नाशिक येथे  आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सीए प्रफुल्ल छाजेड म्हणाले, सनदी लेखापाल हे परीक्षणाचे नव्हे, तर लेखानोंदीच्या पडताळणीचे काम करतात. त्यामुळे अस्थापनांनी उपलब्ध करून दिलेल्या दस्तऐवजांचे ताळेबंद व लेखा अहवालांसोबतचे पुरावे सनदी लेखापाल ग्राह्य धरून लेखापरीक्षण करीत असतात. त्यामुळे अनेकदा अस्थानांमधील अंतर्गत कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी नियोजनपूर्व भ्रष्टाचाल सनदी लेखापालाच्या नजरेतून राहून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकरणात सनदी लेखापाल नव्हे, तर संबंधित अस्थापानांचे अंतर्गत लेखाअधिकारीच जाबाबदार असल्याचे स्पष्ट केले. छाजेड यांनी या वक्तव्याच्या माध्यमातून पीएनबी घोटाळ्य़ात संबधित बँकेचेच लेखा अधिकारी गुंतलेले असण्याच्या शक्यतेकडे अंगुलीनिर्देश करीत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पीएनबी प्रकरणात लेखापालांकडे केलेला रोख चूकीचा असल्याचे संकेत दिले आहे. दरम्यान, जीएसटी कायद्याच्या अंमलबजावणीत सरकारने धाडसी निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाच्या दिशेने विकासाची प्रेरणा दिली असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी इन्स्टीटय़ूटचे माजी उपाध्यक्ष तथा प्रादेशिक अध्यक्ष सीए मंगेश किनारे, प्रादेशिक सदस्य विक्रांत कुलकर्णी, नाशिक शाखेचे अध्यक्ष मिलन लुणावत आदि उपस्थित होते.         

टॅग्स :chartered accountantसीएNashikनाशिकbankबँक