शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’ नसल्याने ‘निराधार’ होण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 16:53 IST

बोटांचे ठसे पुसट : इगतपुरीच्या शेतकऱ्याची कार्डसाठी दमछाक

ठळक मुद्देत्यांच्याकडे निव्वळ आधारच्या पावत्या असून आधारच्या मुख्य कार्यालयाकडून त्यांचे आधार प्रत्येकवेळी नाकारले जात आहे

भास्कर सोनवणे, इगतपुरी : विविध शासकीय योजनांपासून गॅस, बँक, खतांची खरेदी, पॅन कार्ड आदींसाठी आधार कार्ड हा परवलीचा शब्द बनला आहे. असे असले तरी इगतपुरी तालुक्यातील निनावी ह्या गावातील शेतकरी शंकर गायकवाड यांना मात्र हाताच्या बोटांचे ठसे पुसट झाल्याने शेकडो प्रयत्न करूनही आधार कार्ड मिळत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.गायकवाड यांनी सन २०१३ पासून शेकडो आधार केंद्र ते मुंबईचे कार्यालय गाठूनही त्यांना आधार कार्ड मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांचे गॅस कनेक्शन तर केव्हाच बंद झालेले आहे. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे कैफियत मांडावी म्हणून त्यांनी अनेक खेटा घातल्या. मात्र जिल्हाधिका-यांना भेटू दिले जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे. आधार नसल्यामुळे ह्या शेतक-यावर निराधार व्हायची मात्र वेळ आली आहे. शंकर गायकवाड हे कष्टकरी शेतकरी आहेत. कष्टामुळे त्यांच्या हाताचे ठसे पूर्णपणे पुसून गेले आहेत. २०१३ पासून त्यांनी जिल्ह्यातील विविध आधार कार्ड सेंटरला खेटा घातल्या. ६ वर्षांपासून ते आधार कार्ड मिळावे म्हणून अविरत प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याकडे निव्वळ आधारच्या पावत्या असून आधारच्या मुख्य कार्यालयाकडून त्यांचे आधार प्रत्येकवेळी नाकारले जात आहे. आधार नसल्यामुळे त्यांचे गॅस कनेक्शन आणि मिळणारे अनुदान बंद करण्यात आले आहे. मुलगा सैन्यदलातशेतकरी शंकर गायकवाड यांचा एक मुलगा सैन्यात सेवेत आहे. देशाची सेवा करणारे कुटुंब असूनही आधारमुळे त्यांची ससेहोलपट होतांना दिसून येत आहे. सैन्यातील वरिष्ठ अधिकाºयांकडे मुलाने याबाबत माहिती द्यावी असे शंकर गायकवाड यांनी मुलाला कळवले. मात्र सैन्याशी संबंधित नसलेला विषय कसा मांडावा असा प्रश्न मुलाला पडला आहे. 

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी