शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

वक्त्यांची संख्या वाढल्याने गोेंधळ

By admin | Updated: June 9, 2017 01:14 IST

वक्त्यांची संख्या वाढल्याने गोेंधळ

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी संपाचे केंद्रबिंदू ठरलेल्या नाशिकच्या तुपसाखरे लॉन्सवरील व्यासपीठावरील वक्त्यांची संख्या वाढल्याने संयोजक आणि नियंत्रकांमध्ये काही वेळा गोेंधळाचे प्रसंग निर्माण झाल्याचे चित्र होते. गोंधळाची सुरुवात कल्पना इनामदार या महिला वक्त्यापासून सुरू झाली.चार-पाच भाषणे झाल्यानंतर सूत्रसंचालक हंसराज वडघुले यांनी खासदार राजू शेट्टी यांच्या भाषणाची घोषणा करताच शेकापचे आमदार जयंत पाटील व डॉ. अजित नवले यांनी नाराजी व्यक्त केली. वडघुले व डॉ. अजित नवले यांनी माईक खेचून वक्त्यांची नावे जाहीर करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी शेतकऱ्यांनी सर्वांना बोलू द्या, असा घोषवारा सुरू केल्यानंतर अशोक ढवळे, संजय मोरे, बाळासाहेब चव्हाण, विश्वनाथ पाटील, मनोज आथरे, सुशीला नरवडे यांच्यासह अन्य वक्त्यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली. शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव खंडेराव मोरे यांना बोलू देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. त्यावेळी खासदार शेट्टींना त्यांच्या मनोगतातून आमचे गुरू माधवराव मोरे असून, माझ्यानंतर ते बोलणार असल्याचे सांगावे लागले. वक्ते बोलत असतानाच राजू देसले, हंसराज वडघुले, अजित नवले यांच्याकडे शेतकऱ्यांनी विविध मागण्यांच्या रूपाने शब्दश: चिठ्ठ्यांचा पाऊस पाडला. पोलिसांकडून छायाचित्रणपरिषदेसाठी पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, देवरे यांच्यासह शंभर पोलिसांचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी यंत्रणेकडून छायाचित्रणही केले गेले. तुपसाखरे लॉन्सकडील रस्ता वाहतुकीसाठी काही काळ बंद करण्यात आला होता. कल्पना इनामदार या महिलेच्या भाषणावेळी झालेल्या गोेंधळानंतर या महिलेला महिला पोलिसांनी कडे करून सुरक्षित सोडले.