शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

नाशिकला महापुराचे संकेत; नारोशंकर मंदिराचे छत बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 10:16 IST

नारोशंकर मंदिरावरील घंटेपर्यंत पाणी पोहचले आहे. मंदिरचे संपूर्ण छत पुराच्या पाण्यात बुडाले आहे. नदीच्या पुराचे मापक असलेला दुतोंडया मारुती शुक्रवारी रात्रीच पाण्याखाली बुडाला.

नाशिक - मागील दोन दिवसांपासून नाशिक शहरात जोर धरलेल्या पावसाची संततधार रात्रीपासून अधिकच वाढली आहे. शहारात सकाळी 8 वाजेपर्यंत 80मिमी पाऊस पडला. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून खबरदारीचा उपाय म्हणून दर तासाला 3 हजार क्यूसेक इतका विसर्ग विसर्ग केला जात आहे. आज सकाळच्या आकडेवारीनुसार गंगापूर धरणातून सकाळी साडे 9 वाजता 23 हजार 445 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू गेला. तसेच होळकर पुलाखालून पाण्याचा विसर्ग ३० हजार क्युसेकपेक्षा अधिक असून धोक्याची पातळीच्या अधिक वर गोदावरी वाहू लागली आहे.  

नारोशंकर मंदिरावरील घंटेपर्यंत पाणी पोहचले आहे. मंदिरचे संपूर्ण छत पुराच्या पाण्यात बुडाले आहे. नदीच्या पुराचे मापक असलेला दुतोंडया मारुती शुक्रवारी रात्रीच पाण्याखाली बुडाला. महापुराचे संकेत देणाऱ्या नारोशंकर मंदिराच्या घंटेला पाणी लागण्याची शक्यता आहे. कारण या मंदिराचे छत पाण्याखाली गेले असून केवळ घंटा आणि कळस नजरेस पडत आहे. विसर्गात वाढ झाल्यास आणि शहारत पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास घंटेपर्यंत पुर पातळी पोहचू शकते. तसे झाल्यास गोदावरीला महापूर येईल. गाडगे महाराज पुलाच्या खाली पाणी लागल्याची माहिती आहे. याठिकाणी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, कर्मचारी तसेच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी ठिकठिकाणी गर्दी करणाऱ्या नाशिककरांना सावधानतेचा इशारा देत आहेत.

आज सकाळी ९वाजेनंतर गोदाकाठालगत सर्व मंदिरे पाण्याखाली गेली. पिंपळ चौक नेहरु चौकाच्या दिशेने पुराचे पाणी जाण्याची शक्यता वाढली आहे. बालाजी कोट,  कापड बाजार, सराफ बाजार, भांडी बाजार जलमय झाला आहे. टाळकुटेश्वर मंदिर पाण्याखाली गेले असून येथील अमरधाम स्मशानभूमीत पाणी शिरले आहे. नदीकाठच्या रहिवाशांना स्थलांतराचे आवाहन प्रशासन करत आहे. नदीकाठी ठिक ठिकाणी  अग्निशमन दलाचे जवान, पोलिस तैनात असून मनपा तसेच जिल्हा आपत्ती निवारण व्यवस्थापन सद्य  परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. गोदावरीचा बापू पुल पाण्याखाली गेला आहे. तसेच घारपुरे घाट पुलावर वाहतूक बंद करण्यात येत आहे. या पुलावरून देखील पाणी थोड्या वेळात वाहणार आहे. पोलिसांनी बँरेकेटिंग करायाला  सुरवात केली आहे.

नाशिककरांनी गरज असेल तरच बाहेर पडावे; 'संडे' पावसाळी पर्यटन टाळा

गरज असल्यास बाहेर पडावे, पावसाळी पर्यटन टाळावे शहरासह जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसामुळे धबधबे, नद्या, नाले, ओहळ ओसंडून वाहत आहे. धोक्याची पातळी गाठल्याची दुर्घटनेची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे कुठल्याही पर्यटन स्थळे जाणे धोक्याचे ठरणारे आहे, असे  प्रशासनाने म्हटले आहे.

गोदावरीला आलेला पूर बघण्यासाठी नाशिककर जनतेने बाहेर पडू नये प्रसारमाध्यमद्वारे पूरस्थिती जाणून घेण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, महापौर रंजना भानसी यांनी केले आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर