शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

गॅस पाइपलाइनमुळे औद्योगिक विकासाला गती मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:58 IST

नाशिक : केंद्र सरकारच्या शहर गॅस वितरण योजनेमुळे स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नाशिककरांना थेट स्वयंपाक घरापर्यंत पाइपलाइनद्वारे गॅस उपलब्ध होणार आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रातही गॅसमुळे ऊर्जेचा स्वस्त व स्वच्छ पर्याय उपलब्ध होणार असल्याने नाशिक व धुळ्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी गुरुवारी (दि.२२) केले.

ठळक मुद्देसुभाष भामरे : शहर गॅस वितरण योजनेचे भूमिपूजन

नाशिक : केंद्र सरकारच्या शहर गॅस वितरण योजनेमुळे स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नाशिककरांना थेट स्वयंपाक घरापर्यंत पाइपलाइनद्वारे गॅस उपलब्ध होणार आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रातही गॅसमुळे ऊर्जेचा स्वस्त व स्वच्छ पर्याय उपलब्ध होणार असल्याने नाशिक व धुळ्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी गुरुवारी (दि.२२) केले.भारत पेट्रोलियम कार्पोरेशन व गेल (इंडिया) यांनी संयुक्तरीत्या स्थापन केलेल्या महाराष्ट्र नॅचरल गॅसच्या लिमिटेडच्या (एमएनजीएल) माध्यमातून नाशिक, धुळे व औरंगाबाद जिल्ह्णातील औद्योगिक आणि घरगुती एलपीजी पुरवठा थेट पाइपलाइनद्वारे करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. याचवेळी नाशिक येथे रावसाहेब थोरात सभागृहात नाशिक व धुळे येथील प्रकल्पांच्या कोनशिलेचे अनावरण केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, एमएनजीएलचे स्वतंत्र संचालक राजेश पांडे व व्यवस्थापकीय संचालक ए. एम. तांबेकर आदी उपस्थित होते. या योजनेअंतर्गत शहरात स्वस्त आणि पर्यावरणपूरक सीएनजी गॅसचा पुरवठा होणार असून, येत्या तीन महिन्यांत शहरात सुमारे चाळीस ते पन्नास सीएनजी पंप सुरू करण्यात येणार आहेत. देशातील पारंपरिक पेट्रोल, डिझेल व कोळशाचा वापर कमी व्हावा यासाठी स्वच्छ नैसर्गिक गॅसला प्रोत्साहन देण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. त्याअंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून नवव्या टप्प्यात १२९ जिल्ह्णांमधील ६५ प्रादेशिक विभागांमध्ये सीएनजी गॅस वितरण योजनेस सुरुवात झाली असून, दहाव्या सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन (सीजीडी) च्या लिलाव प्रक्रियेलाही सुरुवात झाल्याचे भामरे यांनी सांगितले.नाशिकसाठी पालघर येथून शंभर किलोमीटर गॅसवाहिनी टाकण्यात येणार असून, हे काम दोन वर्षांत पूर्ण होईल. तत्पूर्वी नाशिक शहरात चाळीस ते पन्नास ठिकाणी सीएनजी पंप सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी टॅँकरने गॅस पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे तीन महिन्यांतच मोटारींसाठी सीएनजी गॅस उपलब्ध होणार आहे.सध्या पेट्रोल आणि डिझेल महाग होत चालले आहेत. त्यामुळे इंधन वापराबाबत अडचण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सीएनजीचा स्वस्त पर्याय उपलब्ध आहे. शिवाय सीएनजी पर्यावरणपूरक असून, घरगुती वापरासाठीही स्वस्त आहे. अनुदानित सिलिंडर साडेपाचशे रुपयांपर्यंत जाते तर सीएनजी साडेतीनशे रुपयांत पडतो. त्याचप्रमाणे सीएनजी वापरामुळे प्रदूषणात ५० टक्क्यांपर्यंत घट होऊन नाशिकचे पर्यावरण संवर्धनही साधले जाईल.- जयकुमार रावल, पर्यटन मंत्री, महाराष्ट्र राज्य