नाशिक : अति मद्यपानानंतर घरातील जिन्यावरून पाय घसरून पडल्याने २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना चुंचाळे घरकुल योजनेमध्ये गुरुवारी (दि़ ६) घडली़ मयत युवकाचे नाव अशोक भानुदास इंगळे असे आहे़ डोके व तोंडास गंभीर मार लागल्याने त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़ याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
जिन्यावरून पडल्याने युवकाचा मृत्यू
By admin | Updated: October 9, 2016 01:27 IST