शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातबंदीमुळे शेतकरी वर्ग आर्थिक दरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 18:49 IST

लखमापूर : कांदा निर्यातबंदी करून शेतकरीवर्ग आर्थिक दरीत लोटला गेला असून जगाचा पोशिंदा बळीराजा आधाराविना रस्त्यावर उतरला असून, शेतकरीवर्गाचे अश्रू कोण पुसणार? असा सवाल निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देबुकिंग करूनही बियाणे व रोपे मिळत नसल्याने चिंता

लखमापूर : कांदा निर्यातबंदी करून शेतकरीवर्ग आर्थिक दरीत लोटला गेला असून जगाचा पोशिंदा बळीराजा आधाराविना रस्त्यावर उतरला असून, शेतकरीवर्गाचे अश्रू कोण पुसणार? असा सवाल निर्माण झाला आहे.रब्बी व खरीप हंगामात आर्थिक फटका बसलेल्या बळीराजाला आता तरी सुगीचे दिवस येतील असे वातावरण जवळ जवळ तयार झाले असताना एका घोषणेने त्यावर पाणी फिरले. बदलत्या हवामानातील पिकांवर होणार परिणाम, पिके वाचिवण्यासाठी शेतकरी वर्गाची धावपळ, भांडवलाची कमतरता, भांडवल जास्त व उत्पन्नाची आवक कमी हे समीकरण आदी संकटातून पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करीत असताना सरकारने कांद्यावर निर्यातबंदी करून बळीराजाला चारी मुंड्या चित केले आहे. अगोदरचं कोरोनाचे वातावरण त्यात जवळ पुरेसे भांडवल नाही. याही परिस्थिती मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज घेऊन भांडवल उपलब्ध करण्यावर भर दिला. परंतु लॉक डाऊनची स्थिती असल्यामुळे बियाने व रोपे मिळवण्यासाठी शेतकरीवर्गाला तारे वरची कसरत करावी लागली. बुकिंग करून ही बियाने व रोपे मिळत नसल्याने शेतकरी वर्गाच्या भुवया उंचावल्या गेल्या असतांना सरकारने हा निर्णय घेऊन खरीप हंगामातील आशेवर अवकृपाच केली आहे.जवळचे सर्व भांडवल खर्च करून कसे तरी खरिपातील पिकं घेतली. परंतु पावसाचा लहरीपणा तसेच वातावरणातील बदलावाचा पिकांना वेगवेगळ्या स्वरूपाच्या रोगाचा सामना करावा लागला व त्यात बरीच पिकाच्या उत्पन्न वाढीवर मोठ्या प्रमाणात फटका बसला. रब्बी हंगामात व कोरोना काळात वाया गेलेले भांडवल भरून काढण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी कांदा साठवून ठेवला. परंतु अति पावसाने साठवून ठेवलेला कांदा पिकाला मोड व मोठ्या प्रमाणात सडण्याचे प्रमाण वाढल्याने कांदा पिकावरील सर्व आशेवर पाणी फिरले. तसेच पावसाने कांदा पिकाचे नुकसान झाल्याने कांदा पिकाला बाजारपेठेत चांगली मागणी आली व आता कांदा अत्यंत कमी प्रमाणात पाहायला मिळत असताना कांदा निर्यातबंदी केल्याने शेतकरीवर्ग पूर्णपणे हतबल झाला आहे.कांदावरील निर्यातबंदी तत्काळ उठवावीआम्ही मोठ्या मेहनतीने कष्ट करून तसेच अनेक समस्यांचा सामना करून थोडा फार कांदा जतन करून ठेवला होता व रब्बी, तसेच कोरोना काळातील वाया गेलेले भांडवल भरून निघेल, अशी आशा निर्माण झाली होती. कारणं बाजारपेठेत आवक कमी व मागणी जास्त हे समीकरण झाल्याने सध्या चांगला भाव मिळत असताना सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी घोषित केल्याने आमचे पूर्णपणे जीवन उधळून गेले आहे. तरी कांदावरील निर्यातबंदी तत्काळ उठवावी ही मागणी जोर धरीत आहे. 

टॅग्स :onionकांदाagricultureशेती