शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वीज उपकरणनिर्मिती उद्योग विस्तारामुळे मेक इन नाशिकला बळ, एबीबीच्या नवीन कारखान्याचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 17:08 IST

उद्योग विस्तारासाठी नाशिकचे वातावरण पोषक असून येथे उद्योग विकासासाठी आवश्यक वातावरणासोबतच कुशल मन्युष्यबळ उपलब्ध असल्याने एबीबीने नशिकमध्ये उद्योग विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देउद्योग विस्तारासाठी नाशिकचे वातावरण पोषक नाशिकमध्ये कुशल मनुष्यबळाचे उपलब्ध उद्योग विस्तारामुळे मेक इन नाशिकला मिळणार बळ

नाशिक : औद्योगिक क्षेत्रात उद्योग विस्तारासाठी नाशिकचे वातावरण पोषक असून येथे उद्योग विकासासाठी आवश्यक वातावरणासोबतच कुशल मन्युष्यबळ उपलब्ध असल्याने एबीबीने नशिकमध्ये उद्योग विस्तार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कंपनीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक संजीव शर्मा यांनी सांगितले.नाशिकमधील औद्योगिक वसाहतीत गेल्या 40 वर्षापासून आंतरराष्ट्रीय दर्जाची वीज उरकरणे बनविणाऱ्या एबीबी कंपनीने नाशिकमधील वीज उपकरणनिर्मिती उद्योगाचा विस्तार केला असून शुक्रवारी(दि. 19) कंपनीच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत एबीबीने 5 एकर क्षेत्रावर उभारलेल्या नवीन कारखान्याचे कंपनीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक संचालक संजीव शर्मा यांच्या हस्ते झाले. यावेळ एबीबी समुहाचे इलेक्ट्रीफिकेशन प्रोडक्ट व्यवस्थापक मार्को टेलरीनी, मेटेओ केटी, एबीबी इलेक्ट्रीफिकेशन प्रोडक्ट इंडियाचे अध्यक्ष सी. पी.व्यास आदि उपस्थित होते. या नवीन कारखान्यामुळे ह्यमेक इन नशिकह्णच्या अभियानाला बळ मिळाले असून गेल्या अनेक वर्षांपासून नवीन गुंतवणूक येत नसल्याने औद्योगिक क्षेत्रला आलेली मरगळ दूर होण्यास सुरूवात झाली आहे. यावेळी शर्मा यांनी नाशिकमध्ये कुलश मन्यष्यबळ असल्यानेच कंपनीने येथे संशोधन व विकास केंद्रही सुरू केल्याचे सांगत त्यामुळेच नाशिकमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्पादन होत आहे. एबीबीच्या एकूण उत्पादनापैकी नाशिक मधून सर्वाधिक 10 ते 12 टक्के निर्यातक्षम उपकरणांची निर्मिती होते. नव्या कारखान्यामुळे हे प्रमाण काही वर्षातच 20 ते 22 टक्के होण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तर कंपनीने आतार्पयत बहूतांश स्थानिक मनुष्यबळास रोजगार देण्याचे धोरण राबवले असून कंपनीच्या विस्तारामुळे स्थानिक नागरिकांना आणखी रोजगार उपलब्ध होणार असल्याचे कंपनीचे नाशिक युनीटचे प्रमुख गणोश कोठावदे यांनी दिली. परंतु कारखान्याचे उत्पादन मागणीनुसार वाढणार असल्याने मनुष्यबळातही टप्प्याटप्पयाने वाढ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नाशिकमध्ये प्रस्तावित असलेल्या केद्रीय विद्युत संशोधन संस्थेचे (सीपीआरआय) केंद्र सुरु झाल्यास विद्युत उपकरण निर्मिती उद्योगाला मोठय़ा प्रमाणात चालना मिळेल असा विश्वासही कोठावदे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :businessव्यवसायNashikनाशिकMIDCएमआयडीसी