शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देवपूर परिसरातील मोरांचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 17:53 IST

देवपूर : एकेकाळच्या निसर्गरम्य व सिन्नर तालुक्यातील देवपूर परिसरात जागोजागी दिसणाऱ्या मोरांचे अस्तित्व धोक्यात आल्याने  चिंता व्यक्त होत आहे.

निसर्गाचे वरदान लाभलेले गाव म्हणून पूर्वी देवपूरची ओळख होती. गावात प्रवेश करताच दृष्टीने पडणारी खळखळ वाहणारी देवनदी, काठावर असलेल्या पेरू, सिताफळ, बोरांच्या बागा मनाला उल्हसित करत असत. निसर्गाच्या सानिध्यात मोरांचे थवे निर्भयपणे बागडताना आढळून यायचे. येथील ग्रामस्थांना ही बाब नित्याची झाली असली तरी हे दृश्य डोळ्यात साठवून घेण्यासाठी पाहुणेमंडळी आवर्जुन देवपूरला यायची व हरवून जायची. तथापि आता मात्र, येथील चित्र बदलले आहे. एरव्ही उन्हाळ्यातही तुडंूब असलेले देवनदीचे पात्र आता कोरडेठाक पडले आहे. पावसाळ्यात पुरेशा पावासाअभावी देवनदीला पाणी नसल्याने काठावरील बागाही नाहीशा झाल्या. बागा तोडल्यामुळे सहज उपलब्ध होणारा रानमेवा आता खुपच कमी दिसू लागला आहे. आजही फळझाडे तुरळकच पहायला मिळतात. या फळझाडांच्या आश्रयाने असलेले मोरही पहायला मिळतात. तथापि त्यांना अन्नपाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. नदीला पाणी नाही. फळबागा नाही त्यामुळे मोरांची संख्याही कमी होत आहे. नदीच्या कडेला मोरांसाठी पाणवठे बांधण्याची गरज आहे. पाणवठे झाल्यास मोरांची पाण्याच्या शोधार्थ होणारी भटकंती थांबेल. मोरांचे गाव असलेल्या गावातून मोर हद्दपार होण्याची भीती निर्माण होत आहे. वनखात्याने या संदर्भात अन्न व पाण्याची उपलब्धता क रुप द्यावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ