शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

पैठणीला दुष्काळाची किनार

By admin | Updated: May 31, 2016 23:27 IST

विणकरांमध्ये चिंतेचे वातावरण : गेल्या पाच महिन्यांपासून वाढले रेशमाचे भाव

 दत्ता महाले  येवलापाण्याबरोबरच दुष्काळाचे सावट आता पैठणीवर पडले असून, गेल्या पाच महिन्यात रेशमाचे भाव ८०० ते १००० रु पयांनी वाढले असून, सिंगल व डबल पदर रेशमी पैठणीचे भाव ८०० रु पयांनी घसरल्याने विणकरांची चिंता वाढली आहे. कांदाभाव घसरले आणि शेतकरी अडचणीत आले तशीच परिस्थिती येवल्याच्या पैठणीबाबत सध्या झाली आहे. येवला शहराची मुख्य बाजारपेठ ही कांदा व पैठणीवर अवलंबून आहे. कांद्यासह पैठणीला घसरण सुरू झाल्याने आता शहराची बाजारपेठदेखील मंदावली आहे. नवीन वर्ष सुरू झाले तेव्हा जानेवारीमध्ये अडवाण रेशमाचे भाव २३०० रु पये किलो होते, तर उभार रेशीम २८०० रु पये किलो होते. त्यादरम्यान सिंगल पदरी पैठणीला ५००० रुपये भाव मिळत होता तर डबल पदराला ५५०० रु पये भाव मिळत होता. वर्षाची सुरुवात चांगली झाली होती. घरी एक अथवा दोन हातमाग असणाऱ्यांचे बरे चालले होते. परंतु गेल्या पाच महिन्यात येवल्याच्या पैठणीला उतरती कळा लागली असल्याचे विणकरांचे म्हणणे आहे.एप्रिल आणि मे महिन्यात अडवाण रेशमाचे भाव ३४०० रु पये प्रतिकिलो झाले तर उभार रेशीम ३६०० रु पये प्रतिकिलो एवढे वाढले आहे. आणि सध्या पैठणीच्या किमतीत घसरण लागली असून, सिंगल पदरी पैठणीला ४७०० रु पये भाव मिळत असून, डबल पदरी पैठणीला ४२०० रु पये भाव मिळत आहे. पाणी पाऊस नसल्याने पडलेला दुष्काळ हा नैसर्गिक असला तरी त्यासाठी माणूसदेखील तितकाच जबाबदार आहे. परंतु पैठणीच्या बाबत मंदीचे सावट नेमके नैसर्गिक आहे की कृत्रिम याबाबत कारागीर चर्चा करीत आहेत. पैठणी तयार करण्यासाठी किमान ५ ते ६ दिवस लागतात. परंतु सध्या आठवडा भर काम करूनही केवळ ४०० ते ६०० रु पये पदरी पडत असल्याने विणकर मंदीच्या सावटामुळे निराश झाले आहेत. भाव घसरल्याने कामाचा वेगदेखील कमी झाला आहे. विणकर सरासरी दिवसाला ८ ते १० तास काम करतो; मात्र पैठणीच्या भावातील घसरणीमुळे काम करूनही पैसा दिसत नसल्याने दिवसभरात ४ ते ५ तास काम विणकर करत असल्याचे चित्र आहे. सध्या मालाला उठाव नसल्याने पैठणी विणकराकडून खरेदी करणेदेखील व्यापाऱ्यांनी कमी केले आहे. एक अथवा दोन हातमाग असणारे विणकर पन्नास व शंभर पैठणीचे नग सांभाळण्याची क्षमता नसलेल्या विणकरांना या मंदीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसत आहे. पुणे, मुंबई शहरात व्यापाऱ्यांना पैठणी विकली तर भाव मिळतो. परंतु दोन चार पैठणीचे नग विक्र ीसाठी घेऊन जाणे सर्वसामान्य विणकराला परवडत नाही त्यामुळे तयार नग हे गावातच कमी भावात विकण्याशिवाय पर्याय नाही. स्थानिक व्यापारी बाजारपेठेतील उठाव पाहूनच भाव ठरवतात. सर्वसामान्य पैठणी उत्पादक विणकर व मजूर यांच्यात एकवाक्यता नसल्याने पैठणीचे व्यापारी कमी-अधिक दराने पैठणी खरेदी करत असतात. शिवाय आठवडाभर पैठणीचा नग तयार करून त्यात जर काही चूक निघाली तर पुन्हा ४०० ते ५०० रु पयाने नगाचा भाव घसरतो. सध्या जेमतेम रोजीरोटी कशीबशी भागविण्याची परिस्थिती सर्वसामान्य विणकर व मजुरावर आलेली आहे.केंद्र सरकारने रास्त भावात रेशीम उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक पातळीवर किमान चार ते पाच केंद्र सुरू करावे, अशी मागणी विणकराकडून होत आहे. महिलांचे राजवस्र म्हणून कागदावर पैठणीला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली असली तरी, सध्या पैठणीची कलाकुसर तयार करणाऱ्या सर्वसामान्य विणकराना सक्रिय कृतियुक्त दिलासा विविध योजना राबवून देण्याची गरज आहे. ४०० वर्षाच्या प्रदीर्घ प्रवास करणारी पैठणी मोठमोठ्या समारंभ व फॅशन शोमधून झळकत असली, तरी या व्यवसायाला घरघर लागली आहे. हवा तसा राजाश्रय मिळत नसल्याने पैठणीचे अर्थकारण सर्वसामान्य विणकराला अधोगतीकडे नेत आहे.