शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

द्राक्ष निर्यातीत यंदा तीस हजार टनांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 01:14 IST

ओझर : द्राक्ष निर्यातीमध्ये भारतातील ऐंशी टक्के वाटा असणाऱ्या नाशिकचा हंगाम आटोपला असून, मागील वर्षाच्या तुलनेत निर्यातीत तीस हजार मेट्रिक टनांची घट झाली आहे. नैसर्गिक संकटांमुळे निर्यात मंदावली असली तरी भावाची सरासरी मात्र बागायतदारांना दिलासा देणारी ठरली आहे.

ठळक मुद्देओझर : द्राक्ष निर्यातीमध्ये भारतातील ऐंशी टक्के वाटा असणाऱ्या नाशिकचा हंगाम आटोपला असून, मागील वर्षाच्या तुलनेत निर्यातीत तीस हजार मेट्रिक टनांची घट झाली आहे. नैसर्गिक संकटांमुळे निर्यात मंदावली असली तरी भावाची सरासरी मात्र बागायतदारांना दिलासा देणारी ठरल

ओझर : द्राक्ष निर्यातीमध्ये भारतातील ऐंशी टक्के वाटा असणाऱ्या नाशिकचा हंगाम आटोपला असून, मागील वर्षाच्या तुलनेत निर्यातीत तीस हजार मेट्रिक टनांची घट झाली आहे. नैसर्गिक संकटांमुळे निर्यात मंदावली असली तरी भावाची सरासरी मात्र बागायतदारांना दिलासा देणारी ठरली आहे.नाशिक येथून द्राक्षांची सर्वात जास्त निर्यात युरोप खंडात होते. परंतु जिल्ह्यात सप्टेंबरच्या मध्यात छाटणी झालेल्या बागांना परतीच्या पावसाने दिलेल्या फटक्यामुळे बाजारातील आवक घटणार असल्याचा अंदाज व्यक्त होत होता. यंदादेखील वातावरण पोषक दिसत होते. परंतु आॅक्टोबरच्या पहिल्या दिवसापासून पडलेल्या जोरदार पावसाच्या जवळपास प्रारंभीच्या बागा बळी पडल्या. थोड्या दिवसानंतर डावणीचादेखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला होता.यासर्व घटनांमधून शेतकºयानेहार मानली नाही. त्यात आॅक्टोबरचे पहिले चार दिवस सोडले तर त्यानंतर निसर्गाने-देखील चांगली साथदिल्याने राहिलेला माल चांगल्याप्रकारे तयार होण्यास मदत झाली.परंतु झालेले नुकसान हे वीस ते तीस टक्के राहिल्याने त्याचा थेट परिणाम शेवटी दिसून आला. तूर्तास बागायत पट्ट्यांमध्ये रूई, धारणगाव निफाडचा काही भाग, खेडगाव, अंतरवेली, साकोरे मिग व इतर काही ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणात माल उपलब्ध आहे.राज्याच्या विविध भागातून १०७ टन निर्यातनाशकातून ऐंशी टक्के द्राक्षांच्या विविध जातींची निर्यात होते. परंतु राज्यात सांगली, सातारा, लातूर, पुणे, उस्मानाबाद, अहमदनगर, सोलापूर, बीडसह कर्नाटकमधूनदेखील १०७ मे.टन द्राक्ष निर्यात झाली आहे तर भावातील चढउतार बघता यंदा मधल्या काळात सरासरी भाव मिळण्यास कसरत करावी लागली असली तरी शेवटी दर काही अंशी समाधानकारक राहिल्याने खर्चाचे ताळमेळ काही अंशी बसल्यास मदत झाली.यंदा एकूण १,०२,८१४ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली असून, मागील वर्षी हाच आकडा १,३१,९८० टन इतका होता. त्यात युरोपीय देशात ८०,८१९ मे.टन (मागील वर्षी ९०९९३ मे.टन तर पूर्ण देशातून हा आकडा १०१७१६ मे. टन होता). युरोपीय देशांव्यतिरितक्त यंदा २२१९५ मेट.टन माल निर्यात झाला. (मागील वर्षी हा आकडा ४०९८७ मेट्रिक टन होता)