शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक सुविधांचा बोजवारा उडाल्याने आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:02 IST

देवळालीगावातील सुंदरनगरमध्ये सार्वजनिक शौचालय, उघडा नाला या दोन प्रमुख समस्यांनी रहिवासी त्रस्त झाले आहेत. तसेच बंद पथदीप, अस्वच्छता, घंटागाडी, दुर्गंधी यामुळे नावाला हा परिसर सुंदरनगर असून खरे तर अस्वच्छता व दुर्गंधीनगर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

नाशिकरोड : देवळालीगावातील सुंदरनगरमध्ये सार्वजनिक शौचालय, उघडा नाला या दोन प्रमुख समस्यांनी रहिवासी त्रस्त झाले आहेत. तसेच बंद पथदीप, अस्वच्छता, घंटागाडी, दुर्गंधी यामुळे नावाला हा परिसर सुंदरनगर असून खरे तर अस्वच्छता व दुर्गंधीनगर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.देवळाली गावातील सुंदरनगरमध्ये गोरगरीब सर्वसामान्य नागरिक राहतात. जयभवानीरोड खोले मळा येथून येणारा उघडा नाला, दुर्गंधी परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आणत आहे. विशेष म्हणजे सुंदरनगर म्हणून येणारा हा उघडा नाला रोकडोबावाडी रस्त्याच्या खालून दशक्रिया विधी शेड शेजारून सरळसरळ वालदेवी नदीत जाऊन मिळत आहे. नाल्यातील दुर्गंधीयुक्त पाणी वालदेवी नदीत मिसळत असल्याने नदीचे पावित्र्य, स्वच्छता धोक्यात आली आहे. नदीपात्रातील पाणी अत्यंत कमी झाल्यानंतर नदीपात्राच्या मधोमध खोदलेल्या चारीमध्ये नाल्याचे पाणी कमी राहत असल्याने डासांची उत्पत्ती वाढत आहे.सुंदरनगर लोकसंख्येच्या मानाने अवघे २० शौचालये असून, त्यापैकी पाच महिलांसाठी आहेत. त्यातील १०-१२ शौचालयांचे भांडे, दरवाजे, नळ तुटलेले आहेत. त्यामुळे रहिवासी व विशेष करून महिलांची मोठी गैरसोय होत आहे. मनपा प्रशासनाला वारंवार सांगूनसुद्धा कोणीच लक्ष देत नाही. सुंदरनगरच्या एका बाजूने घंटागाडी येते. मात्र रोकडोबावाडी रस्त्यावरून नाल्याजवळ राहणाऱ्या भागात घंटागाडी येत नसल्याने मोठी गैरसोय होत असल्याचे वत्सलाबाई इंगळे, उषा ढोले यांनी सांगितले.उघड्या नाल्याची अर्धवट सफाई होत असल्याने दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे रहिम शेख यांनी सांगितले. उघडा नाला बंदिस्त करावा तसेच छोटी घंटागाडी नियमित वेळेवर आल्यास दुर्गंधीची मोठी समस्या मार्गी लागेल, असे रंजना शिंदे, संगीता पाटील यांनी सांगितले.वालदेवीच्या स्वच्छतेकडेही दुर्लक्षवालदेवी नदीत उघड्या नाल्यातील मिसळणारे दुर्गंधीयुक्त पाणी थांबविल्यास नदीची स्वच्छता टिकून राहील, असे अरुणा मोरे यांनी सांगितले. सुंदरनगर भागात छोटी-मोठी घरे व गल्लीबोळ असल्याने नियोजनपूर्वक स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज असल्याचे विजया कुमावत यांनी सांगितले. गरिबी व वाढत्या महागाईमुळे पोटाला चिमटा घेऊन जगावे लागते. तर दुसरीकडे अस्वच्छता व दुर्गंधी शरीराच्या दृष्टीने धोकादायक ठरत असल्याचे मंगला सूर्यवंशी यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक