शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
2
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
3
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
4
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
5
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
6
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या
7
'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
8
Crocodile Torture: वसाहतीत घुसलेल्या मगरीसोबत तरुणांचं अमानुष कृत्य, आरोपींचा शोध सुरू!
9
Asia Cup Trophy Hidden Place In Abu Dhabi : पाकची नवी नौटंकी! आशिया कप ट्रॉफी अबुधाबीत लपवली?
10
भारतीय पुरुषांच्या 'स्पर्म क्वालिटी'ने अभ्यासक अवाक्; रिपोर्टमधून 'जगावेगळं'च चित्र समोर
11
आशियाई हवाई हद्दीत अचानक उडताना दिसली रशियाची आण्विक फायटर जेट्स, नेमकं प्रकरण काय?
12
काही सेकंदात होतात जळून खाक, खाजगी बसला आग लागल्यावर प्रवाशांचं वाचणं का होतं कठीण?
13
अरे बापरे! कर्मचाऱ्याच्या प्रेमात वेडी झाली मालकीण; लग्नानंतर 'त्याने'च लावला कोट्यवधींचा चुना
14
मॅडॉक फिल्म्सच्या 'चामुंडा'मध्ये आलिया भटची एन्ट्री कन्फर्म? दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले...
15
इराणमध्ये महागाईचा कहर! हप्त्यांवर कबरीच्या दगडांची खरेदी; कारण जाणून घ्या
16
VIDEO: विराट कोहलीचा 'माईंड गेम'! आधी ट्रेव्हिस हेडशी गप्पा अन् मग पुढच्याच चेंडूवर विकेट
17
Honda vs Suzuki: होन्डा अ‍ॅक्टिव्हा आणि सुझुकी अ‍ॅक्सेसमध्ये चुरस; कोण आहे 'स्मार्ट फीचर्स'चा खरा किंग? वाचा
18
खळबळजनक दावा! सत्ताधारी २१ आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; एकाच ठेकेदारानं दिल्या आलिशान डिफेंडर कार?
19
बुध गुरु युती २०२५: बुध-गुरुचा शक्तिशाली नवपंचम राजयोग; 'या' ७ राशींचा सुखाचा काळ होणार सुरु
20
हेअर फॉलचा वैताग! लसूण की कांद्याचा रस... काळ्याभोर लांब, जाड केसांसाठी सर्वात बेस्ट काय?

नवीन लाल कांद्याचे उशिराने होणाऱ्या आगमनामुळे  जिल्ह्यात कांदा भावात तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 01:17 IST

यंदा सप्टेंबर महिन्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे कांद्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यात नवीन लाल कांद्याचे उशिराने व विलंबाने होणाऱ्या आगमनामुळे भाव तेजीत आहेत. दसºयापर्यंत आणखी भाव वाढविण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. भाव वाढले असले तरी उत्पादकांकडे चांगल्या प्रतवारीचा कांदा फारच कमी आहे. त्यामुळे प्रथम क्र मांक असलेला निर्यातक्षम कांदा बाजारपेठेत चांगलाच भाव खाणार आहे.

लासलगाव : यंदा सप्टेंबर महिन्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे कांद्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यात नवीन लाल कांद्याचे उशिराने व विलंबाने होणाऱ्या आगमनामुळे भाव तेजीत आहेत. दसºयापर्यंत आणखी भाव वाढविण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. भाव वाढले असले तरी उत्पादकांकडे चांगल्या प्रतवारीचा कांदा फारच कमी आहे. त्यामुळे प्रथम क्र मांक असलेला निर्यातक्षम कांदाबाजारपेठेत चांगलाच भाव खाणार आहे.  मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात लासलगाव येथील कांदा बाजारपेठेत ३,०२,४८० क्विंटल कांद्याची आवक होऊनही कमाल भाव ३४००, तर सरासरी भाव २३०० रुपयांपर्यंत होते. त्यामुळे नवीन लाल कांद्याची आवक कमी व विलंबाने होणार असल्याने कांदा भाव या वर्षी दसºयानंतर मागणीचा जोर वाढून मागील वर्षा इतकाच जाहीर होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.  नाफेडने खरेदी केलेला १३,५०० मेट्रिक टनमधील काही कांदा आता रवाना होण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी दिली. त्यामुळे आता उन्हाळ कांदा भाव योग्य होण्यासाठी नाफेडचा कांदा भाव वाढल्यानंतर मोलाची मदत करील अशी चिन्हे आहेत. लासलगाव बाजार समितीत सोमवारी कांदा आवक ही जेमतेम राहिल्याने एकाच दिवशी ८०० पासून २१२१ रुपयांपर्यंत सर्वाधिक जाहीर झाला. मंगळवारी भावाची पातळी सोमवार इतकीच आहे.लासलगाव बाजार समितीत गत सप्ताहात उन्हाळ कांद्याची ५२,३४८ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान ३०१ रुपये, कमाल रु पये १,३९४, तर सर्वसाधारण रु पये १,०८१ प्रती क्विंटल राहिले होते. त्यात या सप्ताहात २१०० रुपये भाव असून, तो वाढण्याची शक्यता आहे.कांदा काढणीला ब्रेकचीनमध्ये पाऊस झाला. तसेच कर्नाटकमधील बंगळूर रोझ या सांबरसाठी जगभर वापरल्या जाणाºया कांद्याच्या काढणीला पावसामुळे ब्रेक लागला. त्यामुळे साठवणुकीतील भारतीय कांदा जागतिक बाजारपेठेत भाव खाणार आहे. तसेच दुसरीकडे ऐन पावसाळ्यात पावसाने दडी मारल्याने राज्यातील पोळ (खरीप) कांद्याची लागवड दीड महिना रखडली. आता श्रावणसरींच्या भरवशावर शेतकºयांनी लागवडीला सुरुवात केली होती. आॅक्टोबरमध्ये नवीन कांदा पहिल्या पंधरवड्यात आलेला नाही. आता दुसºया पंधरवड्यात जर नवीन कांदा बाजारात आला नाही तर उन्हाळ कांदा वाढत्या मागणीमुळे तीन हजारपेक्षा अधिक टप्पा गाठण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.५० लाख टनांपर्यंत साठाउन्हाळ कांद्याचा देशभरात पन्नास लाख टनांपर्यंत साठा असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यातील निम्मा कांदा नोव्हेंबरपर्यंत खाण्यासाठी वापरला जाईल. दहा लाख टन कांद्याचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच, नोव्हेंबरपर्यंत पंधरा लाख टन कांद्याची निर्यात झाल्यास शेतकºयांना चांगला भाव मिळेल, अशी स्थिती सध्या आहे. दरम्यान, खरिपातील मका, सोयाबीनची काढणी झाल्यावर आॅक्टोबरनंतर लेट खरीप म्हणजेच, रांगडा कांद्याची लागवड सुरू होईल. हा कांदा जानेवारी ते मार्च २०१९ पर्यंत बाजारात विक्र ीसाठी उपलब्ध असेल. त्यानंतर एप्रिल ते १५ जूनपर्यंत पाण्याच्या उपलब्धतेच्या आधारे शेतकरी उन्हाळ कांद्याची लागवड सुरू करतील.

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्डMarketबाजार