शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

फळभाज्या आवक घटली, बाजारभाव तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:24 IST

शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी असल्याने त्यातच थंडी पडत असल्याने शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम जाणवला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या फळभाज्यांची आवक घटल्याने गेल्या आठवड्यापासून फळभाज्या तेजीत आल्या आहे.

पंचवटी : शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी असल्याने त्यातच थंडी पडत असल्याने शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम जाणवला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या फळभाज्यांची आवक घटल्याने गेल्या आठवड्यापासून फळभाज्या तेजीत आल्या आहे. एरव्ही १० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणारे गावठी वांगे आता ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत असल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे. बाजार समितीत वांगी, कारले, काकडी, टमाटा तसेच भोपळा आदींसह अन्य फळभाज्या विक्रीसाठी दाखल होत आहे.  गेल्या काही दिवसांपासून शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने तसेच काही भागात थंडी पसरत असल्याने वातावरणाचा फटका फळभाज्यांच्या उत्पादनावर जाणवण्यास सुरुवात झाली आहे. वातावरणामुळे फळभाज्यांची आवक काही प्रमाणात घटलेली आहे. फळभाज्यात सध्या भोपळा वगळता सर्वच फळभाज्यांचे दर तेजीत आले आहे. गणेशोत्सव तसेच नवरात्र कालावधीत ७० ते ८० रुपये प्रति जाळी दराने विक्री होणाºया कारले जाळीला गेल्या आठवड्यापासून २५० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे तर दोडके ३००, काकडी ३०० रुपये दराने विक्री होत आहे. भोपळ्याला कमीत कमी ५ रुपये प्रति नग तर टमाटा १० रुपयाला दोन किलो असा बाजारभाव शेतकºयांना मिळत आहे. आगामी कालावधीत शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडल्यास फळभाज्यांचे दर आणखीनच तेजीत येण्याची शक्यता आहे. एकीकडे पालेभाज्यांची आवक घटल्यानंतरही बाजारभाव घसरले आहेत तर दुसरीकडे मात्र फळभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या