शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना महामारीमुळे यंदा निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा त्र्यंबकेश्वरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 17:02 IST

मोजक्या भाविकांची उपस्थिती : फिजिकल डिस्टन्सिंग राखत नाथांचे नामस्मरण

ठळक मुद्देपालखी येत्या ३० जूनला मोजक्या विश्वस्त आणि भाविकांच्या उपस्थितीत शिवशाही बसने पंढरपूरला

लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : कोरोना महामारीमुळे यंदा टाळ-मृदंगाच्या गजरात लाखो वारकऱ्यांची पंढरीला जाणाºया वारीची परंपरा पहिल्यांदाच खंडित झाली. त्र्यंबकेश्वर येथून दरवर्षी पंढरपूरला प्रस्थान करणाºया पालखीसोबतच संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पादुका जात असल्याने या कालावधीत नाथांचा येणारा संजीवन समाधी सोहळाही वारीतच साजरा होत असतो. यंदा मात्र कोरोनामुळे वारी थांबल्याने निवृत्तीनाथांचा ७२४ वा संजीवन समाधी सोहळा गुरूवारी (दि.१८) ज्येष्ठ वद्य द्वादशीला त्र्यंबकेश्वरीच विश्वस्त आणि मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी भजन-कीर्तनाबरोबरच समाधीची विधीवत पूजाअर्चा करण्यात आली.दरवर्षी आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी पायी दिंडीने पंढरपूरला मार्गस्थ होत असते. पालखी रथात संतश्रेष्ठांच्या पादुका विराजमान असतात. पायी दिंडीच्या वेळापत्रकानुसार सदर पालखी रथ वाटेत नाथांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठ वद्य द्वादशीला अहमदनगर येथे पोहोचत असतो. त्यामुळे पालखी येण्यापूर्वीच नगर येथे संजीवन समाधी सोहळ्याची जय्यत तयारी केली जात असते. पालखीची विधीवत पूजाअर्चा करत त्याठिकाणी भजन-कीर्तनाचा कार्यक्रम होत असतो. एक दिवसाचा मुक्काम आटोपून पालखी पुढच्या मुक्कामाला प्रस्थान करत असते. हा नेम दरवर्षी न चुकता होत आलेला आहे. यंदा मात्र, कोरोना महामारीमुळे वारीची परंपरा खंडित झाली आणि अन्य संतांप्रमाणेच निवृत्तीनाथांचीही पालखीही त्र्यंबकेश्वरीच राहिली. सदर पालखी आता येत्या ३० जूनला मोजक्या विश्वस्त आणि भाविकांच्या उपस्थितीत शिवशाही बसने पंढरपूरला जाणार आहे. नाथांच्या पादुका यंदा समाधी स्थळीच असल्याने ७२४ वा संजीवन समाधी सोहळा त्र्यंबकेश्वरीच गुरूवारी साजरा करण्यात आला. यावेळी विधींचे पौराहित्य गोसावी बंधु यांनी केले. तर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज ट्रस्टचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी विश्वस्त मंडळ उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक