शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

बंद पथदीपांमुळे अशोकामार्गावर अंधारात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 21:22 IST

नाशिक : उच्चभ्रू वसाहत म्हणून नव्याने उदयास येणारा अशोका मार्गाच्या परिसरावर मागील काही महिन्यांपासून चोरट्यांनी वक्रदृष्टी केली असून सातत्याने सोनासाखळ्या ओरबाडण्याचा सिलसिला या परिसरात सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे. सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे अशोका मार्ग सोनसाखळी चोरीचे केेंद्र बनल्याचे बोलले जात आहे.अशोकामार्गावरून गेल्या मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास छाया बापुराव ...

ठळक मुद्दे काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून एका अज्ञात सोनसाखळीचोरअंधाराचा फायदा घेत या भागात सोनसाखळी चोरट्यांनी लक्ष केंद्रीत

नाशिक : उच्चभ्रू वसाहत म्हणून नव्याने उदयास येणारा अशोका मार्गाच्या परिसरावर मागील काही महिन्यांपासून चोरट्यांनी वक्रदृष्टी केली असून सातत्याने सोनासाखळ्या ओरबाडण्याचा सिलसिला या परिसरात सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे. सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे अशोका मार्ग सोनसाखळी चोरीचे केेंद्र बनल्याचे बोलले जात आहे.अशोकामार्गावरून गेल्या मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास छाया बापुराव व्यवहारे या त्यांच्या कन्या प्रिती उत्तरवार यांच्यासोबत शतपावलीसाठी बाहेर पडल्या. दरम्यान, घरी परतताना एका काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून एका अज्ञात सोनसाखळीचोर तरूणाने व्यवहारे यांच्या गळ्यामधील पंधरा ग्रॅम वजनाची सुमारे तीस हजार रुपये किंमतीची सोनसाखळी हिसकावून पळ काढल्याची घटना घडली. उत्तरवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात सोनसाखळीचोरट्याविरुध्द मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोका मार्ग परिसरातील रहिवाशी रात्रीच्या सुमारास मोठ्या संख्येने शतपावलीसाठी बाहेर पडतात. यामध्ये महिलांची संख्या अधिक असते. यावेळी रस्त्यावरील मिणमिणत्या दिव्यांप्रमाणे पथदीपांमुळे महिलांना वाटही दिसत नाही आणि दुचाकीस्वारांनाही रस्त्यावरील अनेकदा अंदाज येत बांधणे अवघड होते. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळते. तसेच अंधाराचा फायदा घेत या भागात सोनसाखळी चोरट्यांनी लक्ष केंद्रीत करुन सातत्याने महिलांच्या गळयातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढण्याचा ‘प्रताप’ सुरूच ठेवला आहे. या घटनेअगोदर एक जेष्ठ महिला घरी जाताना चोरट्यांनी रात्री त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला होता.

टॅग्स :GoldसोनंNashikनाशिक