शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

थंडीमुळे द्राक्ष पिकाला अजूनही धोका

By admin | Updated: January 17, 2017 00:45 IST

शेतकऱ्यांना चिंता : मण्यांची फुगवण थांबली

सिद्धपिंप्री : डिसेंबर अखेरची थंडी आणि जानेवारीत राज्यातील सर्वांत नीचांकी तपमानाची नोंद अशा वातावरणात सिद्धपिंप्री परिसरातील द्राक्ष पिकाला चांगलाच फटका बसला आहे. द्राक्षमणी फुटल्याने उरलेसुरले द्राक्ष वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना बागावर पांघरूण घालण्याची वेळ आली आहे. दरम्यान, मकरसंक्रांतीपासून थंडी कमी जाणवत असली तरी ढगाळ वातावरणाचे संकट कायम आहे.  नाशिक शहर परिसरात तसेच निफाडमध्ये सर्वाधिक कडाक्याची थंडी पडल्याने या भागातील द्राक्षाचे पीक धोक्यात आले आहे. परिसरातील सिद्धपिंप्री, चितेगाव, खेरवाडी, लाखलगाव, माडसांगवी, विंचूरगवळी आदि परिसरात मेठ्या प्रमाणात द्राक्षबागा आहेत. या परिसरातील द्राक्ष पिकाला फटका बसला आहे. झाडांची मुळे थंडीमुळे गोठली असून, द्राक्ष मण्यांना तडे गेले आहेत. त्यामुळे द्राक्षांचा गोडवा कमी होण्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहेत. (प्रतिनिधी)बागांमध्ये शेकोटीथंडीनंतर द्राक्षपीक वाचविण्यासाठी बागांना डिंपद्वारे पाणी दिले जात असून, बागांमध्ये शेकोटी पेटविली जात आहे. शिवाय द्राक्ष पिकाच्या वरच्या बाजूने कापड्याने रोपे झाकण्यात आली आहेत. काही ठिकाणी कागदही टाकला जात आहे. काहीप्रमाणात थंडीची तीव्रता कमी झाली असली तरी दमट आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. आणखी काही दिवस ढगाळ वातावरण राहिल्यास पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवित आहेत.