शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:15 IST

गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलामुळे शेतकरी पुरता त्रस्त असून, हवामान खात्याने पुढील काही दिवसात पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. मानोरी, मुखेड, सत्यगाव, देशमाने आदी परिसरात शेती मशागतीमध्ये गहू सोंगणी, कांदे, हरबरा काढणीची कामे जोरात सुरू आहेत.

मानोरी : गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलामुळे शेतकरी पुरता त्रस्त असून, हवामान खात्याने पुढील काही दिवसात पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. मानोरी, मुखेड, सत्यगाव, देशमाने आदी परिसरात शेती मशागतीमध्ये गहू सोंगणी, कांदे, हरबरा काढणीची कामे जोरात सुरू आहेत. कांदा, गहू पिकाला गेल्या दहा - बारा दिवसांपूर्वी पाण्याची गरज भासत होती. कांदा पीक पाण्याविना करपू लागले होते. त्यामुळे आवर्तनाच्या माध्यमातून पाणी मिळविण्यासाठी अनेक प्रकारची आंदोलने करत शेतकºयांनी पाणी मिळवून पिकांना जीवदान दिले. परंतु मागील तीन ते चार दिवसात हवामानात बदल होत असून, ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस पडू लागल्याने बळीराजा पुरता हतबल झाला आहे. कांदे काढून विकावे की साठवावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. आकाशातील काळ्या ढगाळ वातावरणामुळे पाऊस कधी बरसेल याचा अंदाज नाही. आधीच कमी दरात कांद्याला भाव मिळत असल्याने अशा वातावरणात अजून तोटा सहन करावा लागण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे कांदा पिकावर झालेला खर्च भरून निघण्याचीसुद्धा नामुष्की शेतकºयांवर ओढवली आहे. महागडी कीटकनाशके, रासायनिक खते, कांदे काढणीला सात हजार रुपये प्रतिएकर भाव, मजुरी आदी खर्च करून योग्य भाव मिळत नसल्याने तर शेतकºयांची तेल गेले अन् तूपही गेले अशी अवस्था झाली आहे. गव्हाची स्थिती कांद्याच्या पिकासारखी झाली आहे. गहू सोंगणीला मजूर मिळत नसल्याने अशा ढगाळ वातावरणामुळे हार्वेस्टिंग मशीनला प्राधान्य दिले जात आहे. मागील दोन दिवसांत शेतकरी त्यांच्या मागावर आहेत. एक हजार ते बाराशे रुपये प्रतिएकर मजुरी देऊनही मशीन मिळत नाही. अशात जर पावसाने धुमाकूळ घातला तर वाळलेले गव्हाचे पीक भुईसपाट होण्याच्या भीतीने शेतकरी संकटात सापडला आहे.

टॅग्स :Natureनिसर्गFarmerशेतकरी