कसबे सुकेणे : ओझर येथील एचएएलच्या सीएसआर फंडातुन कसबे सुकेणे शिवारातील मंदाकिनी माता मंदिर फाटा ते शिरसगाव-सुकेणा रस्ता डांबरीकरण होणार असल्याची माहिती कसबे सुकेणेचे उपसरपंच धनंजय भंडारे यांनी दिली.एचएएलच्या नाशिक विभागाचे उपव्यवस्थापक व डेप्युटी जनरल मॅनेजर यांच्यावतीने सीएसआर फंडातुन हा रस्ता होत असुन कसबे सुकेणे ग्रामपालिकेने तसा प्रस्ताव एचएएलला सादर करुन पाठपुरावा केला होता.सदरचे डांबरीकरण काम मंजुर झाले आहे. तसेच एचएएलने सीएसआर निधीतून कसबे सुकेणे येथे बेघरवस्ती जलशुध्दीकरण केंद्र, रावसाहेबनगर व काशिनाथनगर येथे ग्रीन जीम, जेष्ठ नागरीकांसाठी ध्यान केंद्र, शहरातील स्वामी समर्थ मंदिर परिसर व रावसाहेबनगर, हिवाळेनगर रस्ता कॉंक्रीटीकरण, काठेनगर, दगडखाण, ओझर रस्त्यावर जनार्दन स्वामी पर्णकुटी ते थेरगाव फाटा सुकेणे शिवार रस्ता याठिकाणी एलइडी स्ट्रीट लाईट बसविणे ही कामे मंजुरी करुन त्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी कसबे सुकेणे ग्रामपालिकेने केली आहे.
एचएएलच्या सीएसआर फंडातुन सुकेणेत रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 00:47 IST
कसबे सुकेणे : ओझर येथील एचएएलच्या सीएसआर फंडातुन कसबे सुकेणे शिवारातील मंदाकिनी माता मंदिर फाटा ते शिरसगाव-सुकेणा रस्ता डांबरीकरण होणार असल्याची माहिती कसबे सुकेणेचे उपसरपंच धनंजय भंडारे यांनी दिली.
एचएएलच्या सीएसआर फंडातुन सुकेणेत रस्ता
ठळक मुद्देसुकेणे ग्रामपालिकेने तसा प्रस्ताव एचएएलला सादर करुन पाठपुरावा केला होता.