शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

लगबग : वाळवणाचे पदार्थ केवळ देशपातळीवरच नाही, तर जगभरात पाठवले जात आहेत उन्हाळी वाळवणामुळे महिलांना मिळतेय रोजगाराची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:26 IST

नाशिक : कडक ऊन म्हटले की जिवाची लाहीलाही होते. उन्हाळा नकोसा वाटतो. पण याच कडक उन्हाचा उपयोग करून घेत वर्षभराची बेगमी अर्थात वाळवणाचे पदार्थ करण्यावर.

ठळक मुद्देतयार वाळवणाचे पदार्थ करून घेण्यावर भर महिलांना त्याद्वारे चांगला रोजगार मिळत आहे

नाशिक : कडक ऊन म्हटले की जिवाची लाहीलाही होते. उन्हाळा नकोसा वाटतो. पण याच कडक उन्हाचा उपयोग करून घेत वर्षभराची बेगमी अर्थात वाळवणाचे पदार्थ करण्यावर, त्यांच्याद्वारे दोन पैसे कमवण्यावर सध्या महिला भर देत आहेत. वैयक्तिक स्वरूपाबरोबरच बचतगटांद्वारेही महिला वडे, पापड आदी असंख्य प्रकारच्या वाळवणाच्या पदार्थांची निर्मिती करत नोकरदार, कामकाजी महिलांची गरज पूर्ण करत आहेत. हे वाळवणाचे पदार्थ केवळ देशपातळीवरच नाही, तर जगभरात विविध भागातही पाठवले जात असून, उद्यमशील महिलांना त्याद्वारे चांगला रोजगार मिळत आहे.सध्या नोकरदार तसेच अनेक गृहिणीही तयार वाळवणाचे पदार्थ करून घेण्यावर भर देत आहेत. हे वाळवणाचे पदार्थ किलो, शेकडा किंवा मेहनताना आदी स्वरूपात करून घेतले जात आहेत. शहरातील २० ते २५ हजार महिलांना यातून रोजगार मिळत असून, खर्च वजा जाता पाच ते पंधरा हजार रुपयांचा नफा हाती पडत आहे. वर्षभर लहानमोठ्या सणांना आणि पाहुणे आल्यानंतर त्यांच्या ताटात इतर पदार्थांबरोबरच चार वाळवणाचे पदार्थ छान तळून, भाजून वाढले की गृहिणीला आणि खाणाऱ्यांनाही समाधान वाटते. उन्हाळा सुरू झाला की वाळवणाच्या पदार्थांची लगबग सुरू होते. मात्र आजकाल सुट्यांचा अभाव, मदतीला हाताशी कुणी नसणे, घरातील मोठ्या मार्गदर्शकांची कमतरता, वाढते ऊन, जागेचा अभाव अशा अनेक कारणांमुळे लोक घरी करत बसण्यापेक्षा हे पदार्थ विकत घेण्यावर भर देऊ लागले आहेत. त्यात खात्रीशीरपणे सहजतेने उपलब्ध होत असलेले घरगुती वाळवणाचे पदार्थ, मशीनवरही लवकर तयार करून मिळण्याची सोय यामुळे झाली आहे. उडदाचे पापड, शेवया, वेफर्स आदी बनवण्यासाठी मशीनही उपलब्ध होत आहेत. दुकानदारांना घाऊक विक्री, यंत्रांच्या साहाय्याने वाळवणाचे पदार्थ करून देणे आणि घरगुती स्वरूपात पदार्थ तयार करून ते विकणे आदी प्रकारे महिलांना रोजगार मिळत आहे. नागली पापड- १८० रुपये किलो, तांदूळ पापड- १६० रुपये किलो, ज्वारी पापड- १७० रुपये किलो, बटाटा पापड- १८० रुपये किलो, पोहा पापड- २०० रुपये किलो, उडिद- २०० रुपये किलो, मद्रास पापड- २०० रुपये किलो, नागली डिस्को पापड- १२० रुपये किलो, शेवया- १४० रुपये किलो, कुरडया- २६० रुपये किलो, वेफर्स- १५० रुपये किलो, चकली- २४० रुपये किलो या दरात मिळत आहे. शेकडा दराने घ्यायचे असल्यास हे पदार्थ उडदाचे पापड- २६० रुपये शेकडा, बटाटा पापड- ३०० रुपये शेकडा, नागली पापड- ३५० रुपये शेकडा, चकली- ३०० रुपये शेकडा, कुरडया- ३५० रुपये शेकडा, तर हातशेवया ३५० रुपये किलो या दराने मिळत आहेत.