शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

प्रमुख रस्त्यांसह शहरात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 01:10 IST

शहरात झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे शहरात रविवारी (दि.२५) प्रमुख रस्त्यांसह बाजारपेठांमध्येही शुकशुकाट दिसून आला. वैद्यकीय कारणांसाठी अथवा विलगीकरणातील रुग्णांना अत्यावश्यक वस्तू पुरविणाऱ्यांव्यतिरिक्त शहरात अन्य कोणीही फिरताना दिसून आले नाही. त्यामुळे शासनाच्या निर्बंधांना नाशिककरांचा प्रतिसाद वाढत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देवाढत्या कोरोनाची भीती : शासनाच्या निर्बंधांना नाशिककरांचा वाढता प्रतिसाद 

नाशिक : शहरात झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे शहरात रविवारी (दि.२५) प्रमुख रस्त्यांसह बाजारपेठांमध्येही शुकशुकाट दिसून आला. वैद्यकीय कारणांसाठी अथवा विलगीकरणातील रुग्णांना अत्यावश्यक वस्तू पुरविणाऱ्यांव्यतिरिक्त शहरात अन्य कोणीही फिरताना दिसून आले नाही. त्यामुळे शासनाच्या निर्बंधांना नाशिककरांचा प्रतिसाद वाढत असल्याचे दिसून येत आहे.  पोलिसी दंडुका आणि वाढत्या कोरोना संसर्गाच्या भीतीने सलग सातव्या विकेंडलाही  नाशिककरांनी घरातच राहून शासनाच्या कडक निर्बंधांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आठवडाभरात  १५ टक्के नियमांनुसार, नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडणारा कर्मचारीही रविवारी घरातच थांबल्याने शहरातील विविध रस्त्यांसह मुख्य बाजारपेठांमध्येही अपवाद वगळता शुकशुकाट पहायला मिळाला.  बाजारपेठेत शुकशुकाटग्राहकांची वर्दळ असलेल्या शहरातील मुख्य रस्ते व बाजारपेठेतील रविवार कारंजा, मेनरोड, शालीमार ,शरणपूर रोड, गंगापूर रोड, कॉलेज रोड परिसरात शुकशुकाट होता. गेल्या आठवड्यात जीवनावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्यानंतर या भागातील गर्दीवर नियंत्रण आल्याने शांतता दिसत होती.साखळी तोडण्यासाठी   कडक निर्बंध लागू कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत.  या निर्बंधांची पोलिसांकडून आणखी काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येत असल्याने शहरातील मुख्य रस्तेही रविवारी ओस पडले होते. n     नागरिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांमधून बाहेर पडताना दिसले. मात्र, यात वैद्यकीय कारणासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अधिक होते. काही ठिकाणी किरकोळ प्रमाणात भाजीपाला आणि फळ विक्रेते रस्त्यावर असले तरी त्यांना तासनतास ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागली. पोलीसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, रस्त्यावर पडणाऱ्यांची संख्या अत्यल्प असल्याने त्यांनाही काहीसा आराम मिळाला.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार