शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये १५० हून अधिक वाहनचालकांवर ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’ची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 23:29 IST

नाशिक : सरत्या वर्षाला निरोप व नववर्षांचे स्वागत करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरात पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, तर ग्रामीणमध्ये पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ शहर पोलीस आयुक्तालयातील २६ ठिकाणी नाकाबंदी, तर ३९ ठिकाणी फिक्स पॉर्इंट लावण्यात आले होते़ पोलिसांनी रविवारी (दि़३०) व सोमवारी (दि़३१) या दोन दिवसांत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या दीडशेहून अधिक वाहनचालकांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हची कारवाई केली़ याबरोबरच शेकडो बेशिस्त वाहनचालक व टवाळखोरांवर कारवाई केली़

ठळक मुद्देशहर पोलीस : थर्टि फर्स्टला तगडा बंदोबस्त : झोपडपट्टी परिसरात कोम्बिंग

नाशिक : सरत्या वर्षाला निरोप व नववर्षांचे स्वागत करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरात पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, तर ग्रामीणमध्ये पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ शहर पोलीस आयुक्तालयातील २६ ठिकाणी नाकाबंदी, तर ३९ ठिकाणी फिक्स पॉर्इंट लावण्यात आले होते़ पोलिसांनी रविवारी (दि़३०) व सोमवारी (दि़३१) या दोन दिवसांत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या दीडशेहून अधिक वाहनचालकांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हची कारवाई केली़ याबरोबरच शेकडो बेशिस्त वाहनचालक व टवाळखोरांवर कारवाई केली़

नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. कालावधीत पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता़ त्यामध्ये नाकाबंदी, फिक्स पाँइट, पेट्रोलिंगसह साध्या वेशातील पोलीस बंदोबस्ताचा समावेश होता़ ३१ डिसेंबर हा सोमवारी आल्याने बहुतांशी नागरिकांनी रविवारी (दि.३०) पार्टीचे आयोजन केले होते़ त्यामुळे पोलिसांनी रविवार व सोमवार अशी दोन दिवस कारवाई केली़ सोमवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांची ही वाहनतपासणी मोहीम सुरू होती़ त्यामध्ये १५२ मद्यपी आढळून आल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविणाºया २०० बेशिस्त वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली़

झोपडपट्टी परिसरात कोम्बिंगझोपडपट्टी परिसरात वास्तव्यास असलेल्या गुन्हेगारांवर वचक रहावा यासाठी पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात आले़ यावेळी रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच वाहनांची तपासणी करण्यात आली़ पोलिसांनी टवाळखोर तसेच अश्लील हावभाव करणाºया सुमारे ३५० संशयितांविरोधात कारवाई केली आहे़असा होता शहरातील बंदोबस्तपोलीस आयुक्तालयातील चार पोलीस उपायुक्त, आठ सहायक पोलीस आयुक्त, पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह कर्मचारी रस्त्यावर उतरले होते़ विशेष म्हणजे प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीतील महत्त्वाच्या ठिकाणी तीन नाकाबंदी पॉर्इंट लावण्यात आले होते़ पोलीस अधिकाºयांसह सुमारे दोन हजार पोलीस कर्मचाºयांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता़ब्रेथ अ‍ॅनालायझरच्या साहाय्याने तपासणीशहर वाहतूक शाखेतर्फे महामार्ग, औरंगाबादरोड, पुणेरोड, त्र्यंबकरोड, गंगापूररोड, कॉलेजरोड, पेठरोड, दिंडोरीरोड, शहरातील प्रमुख चौक व प्रमुख रस्त्यांवर ४२ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती़ याठिकाणी वाहनचालकांची १५ ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनच्या साहाय्याने तपासणी केली जात होती़ तसेच हुज्जत घालणाºया नागरिकांचे १३० बॉर्डी वॉर्न कॅमेराद्वारे छायाचित्रणही केले जात होते़ यावेळी मद्यप्राशन करून वाहन चालविणाºयांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हची कारवाई करण्यात आली़

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक