शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भुसे यांच्याकडून दुष्काळ आढावा दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:29 IST

मालेगाव तालुक्यात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी रविवारी तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दुष्काळ आढावा दौरा केला.

मालेगाव : मालेगाव तालुक्यात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी रविवारी तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दुष्काळ आढावा दौरा केला.तालुक्यात दोन महिन्यात फक्त १०० मि.मी. पाऊस झाला असून पेरणी झालेले क्षेत्र होरपळून गेले आहे. तालुक्यातील विहिरी व कुपनलिका कोरड्या पडल्या आहेत. गुरांना चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतमजुरांना काम नाही. मालेगाव तालुक्यात सरासरीपेक्षा ३० टक्के पाऊस झाला आहे. आता पाऊस आला तरी पिकांच्या उत्पन्नात ५० टक्के घट होणार आहे. शेतकºयांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे आहे. या सर्व बाबींचा विचार करुन मालेगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी राज्यमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.यासंदर्भात तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा बैठक भुसे यांनी ३ आॅगस्ट रोजी घेतली असून अधिकाºयांना टंचाई परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना केल्या. भुसे यांनी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरा गेल्या शुक्रवारी सौंदाणे, नांदगाव, चिंचावड, आघार खु., पाटणे, वाके, मुंगसे, टेहरे येथे तर रविवारी सायने खु., दहिकुटे, माणके, चिखलओहोळ, नाळे, शेंदुर्णी, साजवहाळ, भिलकोट, देवारपाडे, गुगुळवाड, पळासदरे, झोडगे, कंधाणे, दहिदी, करंजगव्हाण, लेंडाणे, वडगाव या गावांचाल दौरा केला. सदर गावातील नागरिकांशी दुष्काळी परिस्थितीबाबत संवाद साधून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. सदर दौºयाप्रसंगी भुसे यांचे समवेत तालुका प्रमुख संजय दुसाने, शहर प्रमुख श्रीराम मिस्तरी, जि. प. सदस्य दादाजी शेजवळ, प्रमोद पाटील, तहसीलदार श्रीमती ज्योती देवरे, तालुका कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, पाणीपुरवठा अधिकारी पगार, पशुवैद्यकीय अधिकारी चव्हाण, वीज वितरणचे वडगे, सांगोडे, इवद उपअभियंता सूर्यवंशी, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन व ग्रामस्थ उपस्थित होते.त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देशतालुक्यात झालेल्या अल्प पावसामुळे चाराटंचाई, पाणीटंचाई, गुरांसाठी छावणी, दुबार पेरणीचे संकट या भविष्यात उद्भवणाºया समस्यांना सामोरे जाण्यासाठी सर्वांनी दक्ष रहावे, असे आवाहन राज्यमंत्री भुसे यांनी दौºयाप्रसंगी ग्रामस्थांना केले. आपल्या गावात टंचाईबाबत कोणकोणत्या उपाययोजना करता येतील. प्रत्येक गावातील समस्यांची अधिकाºयांनी तातडीने नोंद घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :droughtदुष्काळMalegaonमालेगांव