ब्राह्मणगांव : बागलाणच्या पूर्व भागात या वर्षी संपूर्ण पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने आत्ताच दुष्काळी परिस्थिती जाणवू लागली आहे.पावसाच्या भरवशावर शेतकºयांनी खरीपची पिके घेतलीखरी पण पाऊसच न आल्याने खरीप पिकांची वाढ न झाल्याने जनावरांसाठी चाºयाचा बिकट प्रश्न निर्माण झाला असून पुढील काळात पशुधन कसे जगवावे या विवचनेत शेतकरी आहेत. आधीच मका पिकाचे क्षेत्र पन्नास टक्के घटले असल्यामुळे चाºयाचा प्रश्न जास्त गंभीर झाला आहे . परिसरात पाऊस न आल्याने विहिरीच्या पाण्याची पातळी आत्ताच कमी झाली असून शेती ऐवजी पिण्याच्या पाण्याच्या संकटाची भिती वाडू लागली आहे. पिकांना आत्ताच पाणी नसल्याने लाल कांदा व उन्हाळ कांद्याची लागवड ठप्प होण्याची चिन्हे दिसत आहेत. मागील उन्हाळ कांद्याला अद्या थोडाफार भाव वाढला असला तरी वातावरणात उष्मा वाढल्याने तो कांदा किती काळ टिकेल यांची खात्री देता येत नाही. मात्र पाण्याचे संकट सर्वात जास्त असून खरीपाचे उत्पन्न हातात आले नाही व रब्बीची पाण्यामुळे उत्पन्न न येण्याचे स्पष्टचित्र असल्याने येत्या दिवाळी सणावर ही त्याचा परिणाम होणार आहे. पशुधन जगवण्यासाठी शेतकºयांनी आत्ताच चाºयाची शोधाशोध सुरु केली आहे. त्यामुळे इकडून तिकडून चारा संग्रही करत असल्यामुळे चाºयाचे भावही वाढले आहेत. पुढील काळात दुष्काळी चित्र पाहता शासनाने योग्य ती दखल घेऊन योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी परिस्थिती गडद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 17:53 IST
ब्राह्मणगांव : बागलाणच्या पूर्व भागात या वर्षी संपूर्ण पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने आत्ताच दुष्काळी परिस्थिती जाणवू लागली आहे.
परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी परिस्थिती गडद
ठळक मुद्देब्राह्मणगांव : जनावरांसाठी चाऱ्याची शोधाशोध सुरु ; मका पिकाचे क्षेत्र घटले पन्नास टक्के