शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी तालुक्यांना शेतकरी आत्महत्येचे ग्रहण! 

By श्याम बागुल | Updated: November 14, 2018 15:23 IST

नोव्हेंबर अखेर जिल्ह्यात ८९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून, जानेवारीपासून सुरू झालेल्या या आत्महत्येच्या सत्रात दरमहा सरासरी आठ ते दहा शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित असल्याची आकडेवारी समोर आली आहे. आत्महत्या करणा-या शेतक-यांमध्ये साधारणत: २२ ते ४५ असा तरूण वयोगटातील शेतक-यांचा समावेश

नाशिक : जिल्ह्यातील पंधरा पैकी आठ तालुके शासनाने दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना लागू केल्या असल्या तरी, वाढत्या शेतकरी आत्महत्येचे सत्र थोपविण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे उभे ठाकले आहे. विशेष करून मालेगाव, बागलाण, दिंडोरी व निफाड तालुक्यातील शेतक-यांच्या लागोपाठ होणा-या आत्महत्येमुळे सरकारच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, आत्महत्या करू पाहणा-या शेतक-यांसाठी मात्र या दुष्काळी उपाययोजनेत कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.नोव्हेंबर अखेर जिल्ह्यात ८९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून, जानेवारीपासून सुरू झालेल्या या आत्महत्येच्या सत्रात दरमहा सरासरी आठ ते दहा शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित असल्याची आकडेवारी समोर आली आहे. आत्महत्या करणा-या शेतक-यांमध्ये साधारणत: २२ ते ४५ असा तरूण वयोगटातील शेतकºयांचा समावेश अधिक चिंताजनक आहे. शेतकरी आत्महत्येची वाढती संख्या विचार करायला लावणारी असली तरी, अशा आत्महत्येमागच्या कारण मिमांसा देखील तितक्याच विचार करायला लावणा-या आहेत. कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्या करणाºया शेतकºयाच्या कुटूंबियाला शासनाकडून एक लाखाची आर्थिक मदत दिली जात असून, अशी मदत देताना शेतक-याच्या नावावर शेती, सावकार अथवा बॅँकांचे कर्ज असल्याची खात्री केली जाते. पोलीस,महसूल व कृषी विभागाकडून सर्वकष चौकशी केली जात असल्याने एकूण ८९ शेतक-यांपैकी फक्त २६ शेतक-यांनीच कर्जबाजारीपण व नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून, ४९ शेतकºयांनी केलेल्या आत्महत्यांमागे वैैयक्तीक कारणे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात प्रामुख्याने नैराश्य, घरगुती भांडणे, व्यसन अशा कारणांमुळे आत्महत्या झाल्याचे सरकारी अहवालात म्हटलेले आहे. १४ आत्महत्येच्या घटनेची अद्यापही चौकशी केली जात आहे.जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या मालेगाव, दिंडोरी व पाठोपाठ बागलाण तालुक्यात झाल्या आहेत. यातील विशेष म्हणजे शासनाने दुष्काळ जाहीर करतांना पहिल्या टप्प्यातून दिंंडोरी तालुक्याला वगळले होते. नंतर काही मंडळांचा समावेश करण्यात आला तर निफाड तालुक्यात १२ शेतकºयांनी आत्महत्या करूनही या तालुक्याला दुष्काळापासून वंचित ठेवण्यात आले. दुष्काळी म्हणून गणल्या जाणाºया येवला, चांदवड, देवळा या तालुक्यात मात्र शेतकरी आत्महत्येची संख्या अगदीच अल्प आहे तर पेठ व सुरगाणा या दोन तालुक्यात एकाही शेतकºयाने आत्महत्या केलेली नाही. नोव्हेंबर अखेरच जिल्ह्यात चारा, पाण्याची टंचाई भासू लागली असून, त्यात आत्महत्येच्या वाढत्या सत्राने भर पडली आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक