थेंबे थेंबे नाशिकचे गंगापुर धरण भरे; जलसाठा पोहचला ९१ टक्क्यांवर!

By अझहर शेख | Published: August 17, 2023 07:32 PM2023-08-17T19:32:50+5:302023-08-17T19:33:03+5:30

नाशिक शहरात या हंगामात जोरदार असा पाऊस फारसा झाला नाही

Drop by drop filled the Gangapur Dam of Nashik; Water storage reached 91 percent! | थेंबे थेंबे नाशिकचे गंगापुर धरण भरे; जलसाठा पोहचला ९१ टक्क्यांवर!

थेंबे थेंबे नाशिकचे गंगापुर धरण भरे; जलसाठा पोहचला ९१ टक्क्यांवर!

googlenewsNext

अझहर शेख, नाशिक: शहराची तहान भागविणाऱ्या गंगापुर धरणाचा जलसाठा हा वाढू लागल्याने नाशिककरांचा पाणीप्रश्न हा मिटला आहे. शहरात जरी पाऊस नसला तरी मागील पंधरवड्यात पाणलोटक्षेत्रात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. यामुळे तेथून धरणात पाण्याची आवक झाल्याने धरणसाठा गुरूवारी (१७ ऑगस्ट) ९१ टक्क्यांवर पोहचला.

नाशिक शहरात या हंगामात जोरदार असा पाऊस फारसा झाला नाही. आतापर्यंत शहरात २५३.६मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या चार तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. मात्र आठवडाभरापासून या तालुक्यांमध्येही पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली आहे. यामुळे जिल्ह्याला पुन्हा मुसळधारेची प्रतीक्षा कायम आहे. गंगापुर धरणातून आतापर्यंत ५००क्युसेकचा विसर्ग मागील महिन्यात केला गेला होता; मात्र २४तासांतच हा विसर्गही थांबविण्यात आला. धरणाची पातळी मोठ्या प्रमाणात खालवली होती. त्र्यंबकेश्वर, आंबोली भागात होणाऱ्या पावसामुळे धरणात पुरपाण्याची आवक होऊ लागल्याने जलसाठा वाढू लागला आहे.

गंगापुर धरणाचे पाणलोटक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये आतापर्यंत १०६२ मिमी, आंबोलीत १६५० मिमी, गंगापुरमध्ये ७२२ मिमी इतका पाऊस पडला आहे. सर्वाधिक आंबोलीत या हंगामात ३८मिमी इतका उच्चांक राहिला आहे. तसेच त्र्यंबकला १८मिमी इतका उच्चांकी पाऊस पडला आहे. तसेच काश्यपी धरणाच्या क्षेत्रात ६१४मिमी आणि गौतमी-गोदावरी धरणाच्या क्षेत्रात ८४१ मिमी इतका पाऊस मोजण्यात आला आहे.

मागीलवर्षी धरण ९४ टक्क्यांवर होते. सध्या गंगापुर धरणात ५,१४०दलघफू इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. मागील वर्षी १७ऑगस्टपर्यंत गंगापुर धरण हे ९४टक्के भरलेले होते. यावर्षी तीन टक्क्यांनी धरण कमी भरले आहे. मात्र मागीलवर्षी विसर्ग मोठ्या प्रमाणात होऊन इतका साठा १७ऑगस्ट रोजी शिल्लक होता. यावर्षी विसर्ग हा अत्यल्प करण्यात आला आहे. कारण मुसळधार पाऊस जिल्ह्यात नसल्यामुळे धरण थेंबे थेंबे भरत असल्याची स्थिती आहे.

समुहातील धरणांचा साठा असा... (टक्क्यांत)

  • काश्यपी- ५८ टक्के (१०८०दलघफू)
  • गौतमी- ५७ टक्के (१०७१ दलघफू)
  • आळंदी- ७४ टक्के (६०३दलघफू)
  • एकुण- ७८ टक्के ( ७८९४ दलघफू)

Web Title: Drop by drop filled the Gangapur Dam of Nashik; Water storage reached 91 percent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक