नाशिक : शहर व परिसरामध्ये शुक्रवारी पहाटे साडेचार वाजेपासून पाऊस सुरू झाला. सकाळी ६ वाजेपर्यंत मध्यम सरींचा वर्षाव शहरात होता. मात्र ७ वाजेपासून हलक्या पावसाची रिपरिप सुरू झाली. शहरात संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ६ मिमी इतका पाऊस नोंदविला गेला.शहरात पावसाच्या सरी पहाटेपासून दुपारपर्यंत सुरू होत्या. २ वाजेनंतर पावसाचा वर्षाव थांबला. मात्र ढगाळ हवामान कायम होते. संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर शहरातील विविध भागांमध्ये पुन्हा हलक्या व मध्यम सरी कोसळू लागल्या होत्या.शहरासह गंगापूर धरणाच्या परिसरातसुद्धा दुपारनंतर पावसाचा जोर असलेला दिसून आला. गंगापूर धरणाचा जलसाठा संध्याकाळपर्यंत ९३ टक्क्यांवर पोहोचला होता. भारतीय हवामान खात्याकडून मध्य उत्तर महाराष्ट्र पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान ग्रामीण भागातील इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक १०० मिलिमीटर इतका पाऊस शनिवारी सकाळपर्यंत नोंदविला गेला.
शहरात दिवसभर पावसाची रिपरिप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 00:25 IST
नाशिक : शहर व परिसरामध्ये शुक्रवारी पहाटे साडेचार वाजेपासून पाऊस सुरू झाला. सकाळी ६ वाजेपर्यंत मध्यम सरींचा वर्षाव शहरात होता. मात्र ७ वाजेपासून हलक्या पावसाची रिपरिप सुरू झाली. शहरात संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ६ मिमी इतका पाऊस नोंदविला गेला.
शहरात दिवसभर पावसाची रिपरिप
ठळक मुद्दे शहरातील विविध भागांमध्ये पुन्हा हलक्या व मध्यम सरी कोसळू लागल्या होत्या.