शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
6
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
7
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
8
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
9
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
10
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
11
Bageshwar Dham: बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
12
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
13
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
14
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
15
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
16
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
17
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
18
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
19
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
20
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...

मुस्लीम बांधवांनी पुरविले पिण्याचे पाणी

By admin | Updated: September 24, 2016 23:44 IST

जातीय सलोखा : राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन

नाशिक : विविधतेत एकता हीच अखंड भारताची ओळख असून, सुफी संतांच्या महाराष्ट्रात राष्ट्रीय एकात्मता नेहमीच अनुभवयास येते. एकात्मता आणि जातीय सलोख्याचे दर्शन मराठा क्रांती मूक मोर्चामध्येही घडले. मोर्चेकऱ्यांना मुस्लीम कार्यकर्त्यांनी पिण्याचे पाणी देत त्यांच्या तहानेची जाणीव असल्याचे दाखवून दिले.कोपर्डीच्या अमानुष घटनेतील संशयित आरोपींविरुद्ध अतिजलद न्यायालयात खटला चालवून त्यांना मरेपर्यंत फाशी द्यावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील त्रुटी दूर करून पुनर्रचना करावी, शिवजयंती संपूर्ण राज्यात एकाच दिवशी (१९ फेब्रुवारी) साजरी करावी, मराठा समाजाला आरक्षण द्यावे आदि मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील मराठा समाजबांधव शनिवारी (दि.२४) रस्त्यावर उतरले होते. या मोर्चात शाळकरी मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच लोक लाखोंच्या संख्येने सहभागी झाले होते. महिला, युवतींचा सहभागही लक्षणीय होता. तपोवन ते जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे कान्हेरे मैदानापर्यंत पायी चालणाऱ्या मोर्चेकऱ्यांना येणारा थकवा, गर्दीमुळे येणारा घाम आणि दमट हवेमुळे घशाला पडणारी कोरड अशा शारीरिक समस्यांची जाणीव मुस्लीम समाजाच्या काही संघटनांनी ठेवली. जुना आडगाव नाका येथे युवा आदर्श मल्टीपर्पज संस्थेच्या वतीने बबलू शेख, कादीर खान यांच्यासह कार्यकर्त्यांनी पिण्याच्या पाण्याचे शेकडो पाऊच वाटप केले. तसेच खडकाळी सिग्नलवर युवा सोशल अँड एज्युकेशन मल्टीपर्पज संस्थेच्या वतीने पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले. यावेळी असलम खान, गुलाम गौस पाटकरी, सोहेल खान, युनूस खान, एजाज शेख यांच्यासह मुस्लीम कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांना मुस्लीम संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पिण्याचे पाणी वाटप करून जातीय सलोख्याचे दर्शन घडविले. याबरोबरच ‘हम सब एक है’चा संदेश देत राष्ट्रीय एकात्मता जोपासली. (प्रतिनिधी)