शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या मध्यवर्ती बसस्थानकात  शुद्ध पिण्याच्या पाण्याचे एटीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:22 IST

लायन्स क्लब आॅफ नाशिक कार्पोरेटतर्फे येथील जुन्या मध्यवर्ती बसस्थानकाजवळ आरओ फिल्टर केलेले शुद्ध पाणी मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नाशिक : लायन्स क्लब आॅफ नाशिक कार्पोरेटतर्फे येथील जुन्या मध्यवर्ती बसस्थानकाजवळ आरओ फिल्टर केलेले शुद्ध पाणी मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एक रुपयाचे नाणे टाकल्यानंतर एक लिटर पाणी मिळणार असल्याने सीबीएस स्थानकावर बाहेरगावी प्रवास करणाऱ्यांना मोठी सुविधा प्राप्त झाली आहे.  या प्रकल्पासाठी लायन्स क्लब आॅफ नाशिक कार्पोरेटला हर्ष कन्स्ट्रक्शन्स आणि आनंद अ‍ॅग्रो यांचे सहकार्य लाभले आहे. लायन्स क्लबचे प्रांतपाल रमेश शहा यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद््घाटन करण्यात आले. यावेळी लायन्स क्लब आॅफ नाशिक कार्पोरेटचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, सचिव जयम व्यास, खजिनदार डी. एस. पिंगळे, विलास पाटील, विलास बिरारी, उद्धव अहिरे, सुनील लोहारकर, शेखर सोनवणे, रवींद्र दुसाने, नाशिक आगाराचे सहायक वाहतूक अधीक्षक केशव सांगळे आदी उपस्थित होते.लायन्स क्लबतर्फे शहरात विविध ठिकाणी अशाच पद्धतीचे पाण्याचे एटीएम बसविण्यात येणार आहेत. जुने बसस्थानक परिसरात पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर, सिन्नर, कळवण, सटाणा, नंदुरबार आदी ठिकाणी प्रवास करणाºया प्रवाशांची सुविधा  झाली आहे. यामुळे मोठ्या  प्रमाणात प्रवाशांचे चलन वाचणार आहे.पाण्याबाबत उद्घोषणाजुने बसस्थानकावर राज्य परिवहन मंडळाच्या आगार व्यवस्थापकांनी लायन्स क्लबचे आभार मानले असून, प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर पाण्याची सुविधा आहे, अशी उद्घोषणा करण्यात येऊन प्रवाशास या सुविधेचा लाभ घेता येईल.   स्थानकावर विविध ठिकाणी पाण्याच्या एटीएमकडे येण्यासाठी दिशादर्शक लावण्यात येतील, असे आश्वासन राज्य परिवहन मंडळ नाशिक  आगाराचे सहायक वाहतूक अधीक्षक केशव सांगळे यांनी यावेळी बोलताना दिले.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक