शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात ड्रेनेजचे चेंबर्स फोडून सांडपाण्यावरही डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 18:39 IST

पालिकेकडून कारवाई : मोटारी जप्त, गुन्हे दाखल करणार

ठळक मुद्देड्रेनेजलाइनवरील चेंबर्समध्ये दगड, वाळूच्या गोण्या, गोधड्या टाकून सांडपाणी अडवण्याचाही प्रकारभुयारी गटार विभागाच्या कर्मचा-यांमार्फत फुटलेल्या चेंबर्सची साफसफाई करण्याबरोबरच दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत

नाशिक - महापालिकेने टाकलेल्या ड्रेनेजलाईनवरील चेंबर्स फोडून सांडपाण्याचीही चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला असून भुयारी गटार विभागाच्या पथकाने म्हसरूळ शिवारात एका शेतकऱ्याकडून मोटार जप्त करण्याची कारवाई केली आहे. ड्रेनेजलाइनवरील चेंबर्समध्ये दगड, वाळूच्या गोण्या, गोधड्या टाकून सांडपाणी अडवण्याचाही प्रकार निदर्शनास आला आहे. त्यामुळे, आयुक्तांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.महापालिकेच्या भुयारी गटार विभागामार्फत नंदिनी तथा नासर्डी, गोदावरी नदी काठजवळील ड्रेनेजलाइनमधून जाणारे सांडपाणी बंद करण्याची मोहीम हाती घेतली असून काही ठिकाणी औद्योगिक कंपन्यांकडून नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी सोडले जात असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. सदरची मोहीम सुरू असतानाच अनेक ठिकाणी चेंबर्स फोडलेले निदर्शनास आले आहेत. सदर चेंबर्स फोडून त्यात मोठ-मोठे दगड, वाळूने भरलेल्या गोण्या, गोधड्या टाकून पाईपलाइनमधील सांडपाणी अडवले जाते. सदर सांडपाण्याला जवळच वाट करुन देत पाण्याचे तळे तयार केले जाते. सदर साचलेल्या पाण्यात पाईप टाकून मोटारीने पाणी खेचत ते जवळच्या शेतीला दिले जाते. शेतक-यांबरोबरच काही वाळूमाफीयांकडूनही सांडपाणी वळवून त्याचा वापर करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चेंबर्स फोडून सांडपाण्याची तळी साचत असल्याने त्यावर डासांची उत्पत्ती होऊन परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका उत्पन्न होऊ शकतो. म्हसरूळ शिवारात अशाच प्रकारे चेंबर्स फोडून मोटारीने सांडपाणी शेतात पळविले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, महापालिकेच्या पथकाने सदर मोटार जप्त केली असून शेतकºयाचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सद्यस्थितीत भुयारी गटार विभागाच्या कर्मचा-यांमार्फत फुटलेल्या चेंबर्सची साफसफाई करण्याबरोबरच दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यात, कर्मचा-यांना दगडांबरोबरच फ्लेक्स, गोधड्या आढळून येत आहे. त्यामुळे, महापालिकेने सदर ठिकाणी गस्तीपथक कार्यरत ठेवण्याचा विचार चालविला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका