मालेगाव : सोयगाव व परिसराचा मोठ्या झपाट्याने विस्तार होत आहे. सोयगाव परिसराचा हद्दवाढीत समावेश होऊन आता दहा वर्षांचा काळ उलटत आला, मात्र अजूनही गटारी व मोकळ्या भूखंडावरील कचºयाची समस्या जैसे थे आहे. विशेष म्हणजे घंटागाडीची सुविधा असूनही नागरिक मोकळ्या भूखंडावर कचरा टाकत आहेत. यामुळे नागरिकांची उदासीनता दिसून येत आहे.सोयगाव परिसरात प्रभाग क्रमांक १५ चा समावेश होतो. इतर प्रभागांच्या तुलनेत या प्रभागाचा विस्तार मोठा आहे. यात सोयगाव नववसाहत, पार्श्वनाथनगर, तुळजाई कॉलनी, पवननगर, गोविंदनगर, दौलतनगर, सिद्धिविनायक कॉलनी, स्वप्नपूर्तीनगर, आनंदनगर आदी भागांचा समावेश होतो. या प्रभागातील थोड्या फार प्रमाणात रस्ते सोडले तर बहुतांश रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत; मात्र प्रभागातील कचºयाची समस्या कायम आहे.प्रभाग क्रमांक १५ मध्ये पवननगर भागात तर जयरामनगर येथे महिलांसाठी उद्यान साकारले आहे, मात्र अजून काही भागातील नागरिक सुसज्ज उद्यानाच्या प्रतीक्षेत आहेत. येथील इंदिरानगर भागात शौचालयांचा प्रश्न गंभीर आहे. या भागात सार्वजनिक शौचालयांची गरज आहे. या प्रभागातील बंद पडलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.या परिसरात मोकळे पटांगण असल्यामुळे नागरिक या ठिकाणीच कचरा टाकून दुर्गंधी पसरवित आहेत. त्यामुळे बंद पडलेले प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरू करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. काही भागात अजूनही कच्चे रस्ते असल्याने पावसाळ्यात नागरिकांचे व शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात.काही ठिकाणी गटारी आहेत मात्र येथील रहिवाशांनीच या गटारींमध्ये आपल्या घरातील सांडपाणी तसेच शोषखड्डा पाणी सोडल्यामुळे गटारी तुडुंब भरलेल्या आहेत. मनपाचे कर्मचारी सदर गटारी स्वच्छ करूनही या एक दिवसानंतर पुन्हा जैसे थे होत आहेत. त्यामुळे परिसरात डास, मच्छर, चिलटे आदींचे साम्राज्य निर्माण झाले आहे.जुन्या सोयगाव भागात दर रविवारी बाजार भरतो, मात्र बाजार उठून गेल्यावर विक्र ेते याठिकाणी भाजीपाल्याचा कचरा येथेच टाकून निघून जातात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. प्रभागात बºयाच ठिकाणी गटारीदेखील तुंबलेल्या आहेत. महापालिकेच्या स्वच्छता विभागाने साफ दुर्लक्ष केल्यामुळे लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तक्रार करूनही दखल घेतली जात नाही.सोयगावसह परिसरातील बहुतांश कॉलन्यांमध्ये मोकळ्या भूखंडावर नागरिक कचरा टाकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. डास, मच्छर, चिलटे आदींचे साम्राज्य पसरले आहे. महापालिका प्रशासनाने नियमित डास प्रतिबंधक फवारणी करावी.- संदीप पाटील, नागरिकघंटागाडी येते, मात्र मोकळ्या भूखंडावरील कचºयाच्या ढिगाऱ्यांची समस्या कायम आहे. त्यामुळे साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. त्यात फवारणी होत नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.- महेश पवार, नागरिक
सोयगावसह कॉलन्यांना घाण-कचऱ्याचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 00:24 IST
सोयगाव व परिसराचा मोठ्या झपाट्याने विस्तार होत आहे. सोयगाव परिसराचा हद्दवाढीत समावेश होऊन आता दहा वर्षांचा काळ उलटत आला, मात्र अजूनही गटारी व मोकळ्या भूखंडावरील कचºयाची समस्या जैसे थे आहे. विशेष म्हणजे घंटागाडीची सुविधा असूनही नागरिक मोकळ्या भूखंडावर कचरा टाकत आहेत. यामुळे नागरिकांची उदासीनता दिसून येत आहे.
सोयगावसह कॉलन्यांना घाण-कचऱ्याचा विळखा
ठळक मुद्देमालेगाव : हद्दवाढीतील नागरिक अद्यापही नागरी सुविधांच्या प्रतीक्षेत